Dhule Crime News : भांडीवाटपात वशिलेबाजी, काळाबाजार! कामगार महिलांचा आरोप

Dhule Crime : बांधकाम क्षेत्रातील कामगारांना महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळातर्फे मोफत भांडी वाटप करण्यात येत आहेत.
Construction workers thronged outside the godown to get a set of free utensils from the labor board. In the second photograph, a set of utensils available in the Godownum.
Construction workers thronged outside the godown to get a set of free utensils from the labor board. In the second photograph, a set of utensils available in the Godownum.esakal
Updated on

Dhule Crime News : बांधकाम क्षेत्रातील कामगारांना महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळातर्फे मोफत भांडी वाटप करण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत भांडी उपलब्ध असताना संबंधित यंत्रणेकडून लाभार्थ्यांना भांडीवाटप केले जात नाही, उडवाउडवी केली जाते. भांडीवाटपात वशिलेबाजीसह काळाबाजार सुरू आहे, असा आरोप कामगारांनी केला. याप्रश्‍नी गोडाउनबाहेर यंत्रणेविरोधात घोषणाबाजीही केली. (Allegations of women black market worker cheating in pots distribution )

वरखेडी-कुंडाणे (ता. धुळे) येथील गोडाउनमध्ये भांड्यांचे संच वाटप होत आहे. मात्र, काही दिवसांपासून या ठिकाणी मंडळाचे कर्मचारी व कामगारांमध्ये खटके उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. गोडाउनमध्ये भाड्यांचे संच उपलब्ध असताना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप करत या कारभाराविरोधात महिला कामगारांनी गोडाउनबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. (latest marathi news)

Construction workers thronged outside the godown to get a set of free utensils from the labor board. In the second photograph, a set of utensils available in the Godownum.
Dhule Crime News : गावठी पिस्तूलसह फोटो काढणे पडले महागात!

रात्रभर गोडाउनबाहेर

भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी रात्रभर गोडाउनबाहेर रांगेत उभे राहूनही भांडी मिळत नसल्याचा आरोप कामगारांनी केला. त्यामुळे गुरुवारी (ता. १) सकाळी शेकडो कामगारांनी संताप व्यक्त केला. यात महिला कामगार अधिक संतप्त होत्या. गोडाउन भांड्यांच्या संचांनी भरलेले असताना वाटप होत नाही, माल शिल्लक नाही, अशी उत्तरे संबंधित यंत्रणेकडून दिली जात आहेत.

पाचशे-हजार रुपये घेऊन ही भांडी इतरांना विकली जात आहेत. आम्हाला २८ जुलैची तारीख दिली होती. त्यानंतर १ ऑगस्ट तारीख सांगितली. मात्र, आता वाटपाची तारीख नसल्याचे सांगितले. आम्ही रात्रीपासून येथे आलो आहोत, असे कामगारांचे म्हणणे होते. भांड्यांचा काळाबाजार होत आहे, वशिलेबाजी सुरू आहे, असा आरोप कामगारांनी केला. दिवसरात्र रांगेत उभे राहूनही भांडी मिळत नसल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Construction workers thronged outside the godown to get a set of free utensils from the labor board. In the second photograph, a set of utensils available in the Godownum.
Dhule Crime News : सराईत चोरट्यांना ‘मिनी मोक्का’; धुळ्यातील देवपूर पोलिसांकडून राज्यातील पहिली कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.