Dhule Crime News : तोतया GST अधिकाऱ्यांचा आणखी एक प्रताप उघड! नगाव शिवारात लूट प्रकरणी पश्‍चिम देवपूरला गुन्हा

Crime News : ...चालकाच्या माध्यमातून फिर्यादीशी बोलून ट्रकमधील मशिनरीचे डिलीव्हरीचे चलन चुकीचे सांगून पॅकजिंग मशनरी जप्त केली जाईल किंवा टॅक्सेबल रक्कमेच्या दोनशे टक्के दंड तुम्हाला भरावा लागेल, असे सांगत अडीच लाखांची मागणी केली.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

Dhule Crime News : तोतया जीएसटी अधिकाऱ्यांचा आणखी एक प्रताप उघड झाला आहे. पुण्यातील एकाची लाखात फसवणूक केल्याप्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Dhule Crime Another scam of fake GST officers exposed)

Fraud Crime
Nashik Crime News : अपघात करून पसार मद्यतस्कर हजर; एक्साइज वाहन अपघात प्रकरण

रोहित प्रकाश कुळकर्णी (वय ३६, रा. पाटीलनगर, देहू आळंदी रोड, चिखली, पिंपरी-चिंचवड, पुणे) यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या कंपनीचा ट्रक दहा ऑक्टोबर २०२३ ला सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान मुंबई- आग्रा महामार्गावरील नगाव शिवारातील अजमेरा कॉलेज ऑफ फार्मसीजवळील जम्मू का ढाब्यासमोर चार अनोळखी व्यक्तींनी अडविला.

चालकाच्या माध्यमातून फिर्यादीशी बोलून ट्रकमधील मशिनरीचे डिलीव्हरीचे चलन चुकीचे सांगून पॅकजिंग मशनरी जप्त केली जाईल किंवा टॅक्सेबल रक्कमेच्या दोनशे टक्के दंड तुम्हाला भरावा लागेल, असे सांगत अडीच लाखांची मागणी केली. नंतर तडजोडीअंती १ लाख ५ हजार रूपये फोन- पेव्दारे ऑनलाइन स्वीकारून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. यापूर्वी असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. हे रॅकेट समूळ शोधून त्यातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

Fraud Crime
Nashik Crime News : येवल्यातील त्या युवकावर पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com