Dhule Crime News : गोमांस तस्करीचे वाहन अपघातग्रस्त; घटनेनंतर चालक फरारी

Dhule Crime : लळिंग (ता. धुळे) घाटात गुरुवारी (ता. २१) रात्री पावणेबाराच्या सुमारास एक पिक-अप वाहन दुर्घटनाग्रस्त झाले.
Crime
Crimeesakal
Updated on

Dhule Crime News : लळिंग (ता. धुळे) घाटात गुरुवारी (ता. २१) रात्री पावणेबाराच्या सुमारास एक पिक-अप वाहन दुर्घटनाग्रस्त झाले. यासंबंधीची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता वाहनातून गोमांस तस्करी होत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वाहनासह दोन हजार २५० किलो गोमांस असा एकूण सात लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. घटनेनंतर वाहनचालक फरारी झाला. त्याच्याविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (Dhule Crime beef smuggling vehicle was involved in an accident)

मोहाडी पोलिसांना गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास डायल ११२ कार्यप्रणालीवर कॉल आला. त्यात मुंबई-आग्रा महामार्गावर लळिंग घाटात लांडोर बंगल्याच्या पायथ्याला पांढऱ्या रंगाचे पिक-अप वाहन अपघात होऊन पलटी झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मोहाडी पोलिस ठाण्याचे एजाजोद्दीने काझी, संदीप पाटील, मंगल पवार व श्री. पायमोडे घटनास्थळी दाखल झाले.

तेथे पिक-अप (एमएच १५, जीव्ही ८५२६) वाहन रस्त्याच्या मधोमध अपघात होऊन पडलेले आढळले. पोलिसांना वाहनात भाजीपाल्याचे प्लॅस्टिकचे क्रेट दिसले. त्याखाली वाहनाच्या आकाराची बनविलेली लोखंडी पत्री चौकोनी टाकी आढळली. या टाकीत बर्फामध्ये गोमांस ठेवलेले दिसून आले. पोलिसांनी वाहनचालकाचा शोध घेतला, तो वाहन सोडून पळून गेल्याचे निदर्शनास आले.

Crime
Crime: जावई दारु पिऊन द्यायचा मुलीला त्रास! वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

घटनेची विस्तृत माहिती मोहाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांना कळविल्यानंतर त्यांनी वाहन पोलिस ठाण्यात आणण्याची सूचना केली. त्यानुसार वाहन क्रेनच्या सहाय्याने आणण्यात आले. वाहनात दोन हजार २५० किलो गोमांस लपविण्यात आले होते. पोलिसांनी त्याची किंमत तीन लाख ३७ हजार ५०० रुपये आकारली.

चार लाखांच्या पिक-अप वाहनासह एकूण सात लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. एजाजोद्दीन काझी यांच्या फिर्यादीवरून पिक-अप वाहनचालक (नाव व गाव माहिती नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Crime
Mumbai Local Crime: धावत्या लोकलमध्ये दहा वर्षीय मुलीची छेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.