धुळे : संगनमतातून आर्थिक फायद्यासाठी खोटे कागदपत्र, दस्तावेज तयार करून शेती मिळकतीसंदर्भात गैरव्यवहार केल्याचा माजी मंत्र्यांसह चौघांवर दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Dhule Crime Case of misappropriation of farm income former ministers marathi news)
सहकार विभागाचे शेखर साळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार मार्च २००३ ते पाच फेब्रुवारी २०२४ या कालावधीत शिंदखेडा तालुका कुक्कुटपालन सहकारी संस्था मर्यादित दोंडाईचाच्या (अवसायनात) तत्कालीन अध्यक्षांनी संस्थेच्या नावावर नोंदणी दस्त केले.
त्याव्दारे तावखेडे प्र. बे. येथे खरेदी केलेली शेतजमीन (सर्व्हे नंबर २१०, आताचा सर्व्हे नंबर २१०/१ आणि २१०/२) या मिळकतीची खरेदी- विक्री, तसेच कोणत्याही स्वरूपाचे हस्तांतरण दाखविताना त्यासाठीचा दस्त कायद्याने ठरवून दिलेल्या रकमेच्या स्टँप पेपरवर आणि रजिस्ट्रेशन शुल्क न भरता, त्या संदर्भात कोणतीही पूर्तता न करता परस्पर स्वतःच्या नावे खोटे दस्त करून घेत संशयितांनी संगनमताने बेकायदेशीरपणे गैरव्यवहार केला.
त्यातून मिळकत गैरमार्गाने स्वतःच्या नातेवाइकांच्या नावावर करून घेतल्याने माजी मंत्री तथा शिंदखेडा तालुका कुक्कुटपालन सहकारी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख, तत्कालीन सहकार अधिकारी प्र. वा. तोरणे, तत्कालीन मंडळाधिकारी व शिंदखेड्याचा तलाठी आदींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. दोंडाईचाचे उपनिरीक्षक सी. बी. हंडाळ तपास करीत आहेत. (latest marathi news)
देशमुख यांची भूमिका
या प्रकरणी माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले, की माझे वय ८७ वर्षे आहे. ह्रदय आणि पाठीच्या कण्याचे मोठे दुखणे आहे. केवळ सुडभावनेने माझ्या ३६ वर्षांपूर्वीच्या (१९८८) खरेदीच्या कायदेशीर व्यवहाराची मोडतोड करून विरोधकांनी माझ्या विरोधात दोंडाईचा पोलिस ठाण्यात गेल्या पाच वर्षांत सहावा खोटा फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
मला ब्लॅकमेल करणे, माझे चारित्र्यहनन करणे, मला सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत एका ठिकाणी बसून राहूनही संयोजन करू न देणे व येत्या विधानसभा निवडणुकीत आपला मार्ग सुरक्षित करणे हा या खोळसाळपणामागे विरोधकांचा उद्देश आहे. ही तक्रार बिनबुडाची, खोटी व तथ्यहीन आहे. या प्रकरणात मला पोलिस व शासकीय अधिकाऱ्यांची सहानुभूती आहे. त्यांचा या शासनात नाइलाज आहे याची मला जाणीव असल्याचे डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.