Dhule Crime News : हरियानात जाऊन डेबिटकार्ड भामट्याच्या आवळल्या मुसक्या; शिरपूर शहर पोलिसांची कामगिरी

Dhule News : एटीएम सेंटरवर डेबिटकार्डची अदलाबदल करून शेतकऱ्याची ७७ हजार रुपयांत फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात शहर पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत हरियानात जाऊन संशयिताची गठडी वळली.
Dhule Crime News
Dhule Crime Newsesakal
Updated on

Dhule News : एटीएम सेंटरवर डेबिटकार्डची अदलाबदल करून शेतकऱ्याची ७७ हजार रुपयांत फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात शहर पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत हरियानात जाऊन संशयिताची गठडी वळली. त्याच्याकडून फसवणुकीच्या रकमेपैकी दहा हजार रुपये जप्त करण्यात आले. त्याच्या उर्वरित दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. (city police went to Haryana and arrested suspect)

योगेंद्र तोताराम नाईक (वय ४४, रा. मोहिदातांडा, ता. चोपडा) १७ जुलैला दुपारी शहरातील एसबीआयच्या एटीएममध्ये गेले होते. तेथे दोन संशयितांनी पैसे काढून देण्याच्या बहाण्याने त्यांच्या डेबिटकार्डची अदलाबदल केली होती. वेगवेगळ्या ठिकाणावर डेबिटकार्डचा वापर करून त्यांनी नाईक यांच्या खात्यावरून ७७ हजार १६९ रुपये काढून घेतले होते.

शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास प्रतिष्ठेचा करीत कार्यवाहीचे आदेश दिले. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी भागवत सोनवणे यांनी शहर पोलिसांचे कौतुक केले.

पोलिस निरीक्षक के. के. पाटील, उपनिरीक्षक रोशन निकम, शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, पोलिस नाईक रवींद्र आखडमल, हवालदार विनोद आखडमल, गोविंद कोळी, मनोज महाजन, योगेश दाभाडे, आरिफ तडवी, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटू साळुंके व सचिन वाघ यांनी ही कामगिरी बजावली. (latest marathi news)

Dhule Crime News
Dhule Accident : ट्रकने वाहनाला दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं; अपघातात पत्रकार हर्षल भदाणेंचा मृत्यू

डिझेलमुळे लागला छडा

नाईक यांच्याकडून पोलिसांनी संशयितांचे वर्णन घेतले होते. शिरपूर-सेंधवा रस्त्यावरील विविध ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत असताना त्यांना पनाखेड (ता. शिरपूर) येथील त्र्यंबकराज पेट्रोलियमवर संशयिताशी मिळतेजुळते वर्णन असलेली व्यक्ती प्लॅस्टिक ड्रममध्ये डिझेल नेताना दिसली. त्याने डिझेल ट्रक (एचआर ३८, एबी ९३००)मध्ये नेल्याचे निष्पन्न झाले.

या वाहनाचा शोध घेताना ते फरिदाबाद (हरियाना) येथील पंडित रोडवेज या कंपनीचे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी हरियाना येथे पोचून तपास केल्यावर घटनेच्या दिवशी ट्रकवर सद्दाम इसा खान (वय ३०, रा. झांडा, जि. पलवल, हरियाना) चालक म्हणून कामावर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली.

या गुन्ह्यात त्याच्यासोबत संशयित अक्रम अली मोहमंद व अकील याहा मौलवीसाब (दोघे रा. झांडा) सहभागी असल्याचेही त्याने सांगितले. संशयिताकडून दहा हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.

Dhule Crime News
Dhule Bribe Crime : गटविकास अधिकारी व लेखापालाला अक्कलकुवा येथे लाच घेताना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.