Dhule Crime News : दहिवेल हद्दीतून डिझेल चोरी ‘खालसा’! पुरवठा विभागाच्या पथकासह पोलिसांच्या कारवाईत एक कोटीचा मुद्देमाल जप्त

Dhule Crime : डिझेलची चोरी करणाऱ्यांवर उपनियंत्रक शिधावाटप तथा सदस्य राज्यस्तरीय पथकासह साक्री पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एक कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला.
Crime
Crimeesakal
Updated on

Dhule Crime News : दहिवेल हद्दीतील हॉटेल खालसा पंजाब येथे डिझेलची चोरी करणाऱ्यांवर उपनियंत्रक शिधावाटप तथा सदस्य राज्यस्तरीय पथकासह साक्री पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एक कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. यात वाहन चालकासह हॉटेल मालकास ताब्यात घेतले असून व अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गालगत बोडकी खडीजवळ हॉटेल खालसा पंजाब येथे डिझेल चोरी होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. ( Diesel theft from Dahivel area goods worth Rs 1 crore seized in police action )

या माहितीच्या अनुषंगाने दक्षता पथकातील उपनिबंधक (शिधावाटप) मधुकर बोडके, प्रभारी सहाय्यक नियंत्रक विनायक निकम, निरीक्षक प्रकाश पराते, राजीव भेले, सुधीर गव्हाणे, दीपक कदम, विवेक त्रिभुवन, मच्छिंद्र कुठे, सागर वराळे, संदीप दुबे, अमित पाटील, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत, मंडळ अधिकारी रोहित झोडगे, तलाठी सोमनाथ कोकणी यांच्यासह साक्री पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक राजू जाधव, रामलाल अहिरे, प्रमोद जाधव, मंगेश खैरनार आदी हॉटेल खालसा पंजाब येथे गेले असता त्यांना टँकर (क्रमांक जी.जे.१६ ए.वाय. ५६१८) हा नायरा एनर्जी लि खंबालिया पो. बॉक्स नंबर २४ जिल्हा देवभूमी, गुजरात मधून ३५ हजार लिटर डिझेलचा भरणा करून आर. के. ट्रान्स्पोर्ट अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड रायपूर छत्तीसगड या ठिकाणी डिझेल खाली करण्यासाठी रवाना झाला होता.

हा टँकर वर नमूद ठिकाणी पार्किंगमध्ये उभा होता. त्यातून डिझेलची चोरी करताना अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तसेच टँकर (क्रमांक जी.जे.०१, ए. वाय. ५६४२) हादेखील डिझेल चोरीच्या उद्देशाने थांबला होता. तसेच टाटा ९०९ ईएक्स (क्रमांक एम.एच.०४ डी.एस.०७४९) चे मालक हे डिझेलची अनधिकृत चोरी, साठवणूक व विक्री करीत असल्याचे आढळून आले.

Crime
Dhule Crime News : दुचाकीसह मोबाईल हस्तगत; एलसीबीची कारवाई

या कारवाईत साक्री पोलिस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू कलम अन्वये गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी करत आहेत.

टँकरचालकांसह मालकही आरोपी

डिझेल चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पथकाने या ठिकाणाहून एकूण एक कोटी, नऊ लाख, तीस हजार, ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तसेच वाहन चालक नरेंद्र लालमनी, वाहन चालक राजीव बच्चुलाल गांधी (गुप्ता), हॉटेल खालसा पंजाब मालक चमकोर सुखपाल सिंग यांना ताब्यात घेतले आहे. तर टँकर क्रमांक (जी जे. १६, ए.वाय. ५६१८) चे मालक, जी.जे. ०१, डी.व्ही. ५६४२ चे मालक व टाटा ९०९ ईएक्स एम.एच. ०४, डी.एस. ०७४९ चे मालक यांनाही गुन्ह्यात आरोपी केले आहे.

Crime
Dhule Fraud Crime : देशी दारूच्या नकली लेबलद्वारे फसवणूक; नेरच्या तिघांवर गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.