Dhule Crime News : कारमधून बनावट मद्य तस्करी; ‘एलसीबी’कडून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Dhule Crime : हेरगाव (ता. साक्री) फाट्याकडून रायपूरबारीकडे जाणाऱ्या मार्गावर एका कारमधून होणारी बनावट मद्याची तस्करी एलसीबीच्या पथकाने उघड केली.
The car seized by the LCB team.
The car seized by the LCB team.esakal
Updated on

Dhule Crime News : वेहेरगाव (ता. साक्री) फाट्याकडून रायपूरबारीकडे जाणाऱ्या मार्गावर एका कारमधून होणारी बनावट मद्याची तस्करी एलसीबीच्या पथकाने उघड केली. या कारवाईत तीन लाख सहा हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार संशयितांपैकी तिघांना ताब्यात घेतले. एक जण फरारी झाला. एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना वेहेरगाव फाट्यावरून रायपूरबारीकडे कारमधून (एमएच १९ सीएफ ४७३९) बनावट मद्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. ()

या अनुषंगाने पवार यांनी पथकास कारवाईची सूचना दिली. पथकाने वेहेरगाव फाटा ते रायपूरबारीदरम्यान नाकाबंदी करत पाळत ठेवली. गुरुवारी (ता.२०) रात्री साडेनऊच्या सुमारास उपरोक्त संशयित कार येताना पथकाच्या निदर्शनास आली. वाहनाला थांबवून तपासणी केली असता एक लाख ८०० रुपयांचा बनावट मद्यसाठा आढळला. कारवाईत बनावट मद्यासह दोन लाख रुपयांची कार, सहा हजारांचे दोन मोबाईल, असा एकूण तीन लाख सहा हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.

The car seized by the LCB team.
Dhule Crime News : दुचाकीसह मोबाईल हस्तगत; एलसीबीची कारवाई

याप्रकरणी योगेश जगताप यांच्या फिर्यादीवरून रज्जाक सिकंदर पटवे (रा.भोई गल्ली, साक्री), महेंद्र शिवाजी चौधरी (रा. शिवाजीनगर, साक्री), रावसाहेब कारभारी अहिरे (रा. कासारे, ता. साक्री), श्रीराम बाबर (रा. साक्री) या संशयितांवर विविध कलमान्वये निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील श्रीराम बाबर हा फरारी आहे. उर्वरित तिघांना पथकाने ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, योगेश राऊत, धनंजय मोरे, संजय पाटील, चेतन बोरसे, तुषार सूर्यवंशी, योगेश जगताप यांनी ही कारवाई केली.

The car seized by the LCB team.
Dhule Crime News : शहरालगत नगावला चोरट्यांचा रात्रभर धुमाकूळ; 6 ठिकाणी घरफोडी सत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.