चिमठाणे : सोनगीर-दोंडाईचा राज्य महामार्ग क्रमांक एकवर चिमठाणे (ता. शिंदखेडा) गावाजवळ बडोदा-धुळे एसटी बस व मालवाहतूक करणाऱ्या आयशरमध्ये १३ सप्टेंबर रोजी समोरासमोर अपघात होवून दोन लहान बालके, १३ महिला, इतर नऊजण व आयशर चालक असे एकूण २५ प्रवासी जखमी झाले होते. याप्रकरणी रविवारी (ता. २९) आयशर चालकाविरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (crime filed after 16 days in Bus Eicher accident)
बसचालक हंसराज भास्कर सोमवंशी (वय ४३, रा. गुरुदत्त नगर, होमगार्ड कार्यालयासमोर, वलवाडी शिवार, ता. जि. धुळे) यांनी रविवारी शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चिमठाणेजवळ १३ सप्टेंबरला आयशर (एमएच-१८-बीझेड-००२६) व एसटी बस (एमएच-२०-बीएल-२५९७) यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातास आयशरचालक अविनाश रामराव पाटील (रा. जुनवणे, ता. जि. धुळे) हा जबाबदार होता.
त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजी व हलगर्जीपणाने चालवून एसटी बसला समोरुन धडक दिली. या अपघातात प्रवासी तुषार रतिलाल पाडवी (वय ३२, रा. पाडवी गल्ली, मराठे चौक, तळोदा, जि. नंदुरबार), कविता सुनील भोई (वय ३७, रा. भोई गल्ली, तळोदा), विमलबाई चुनिलाल भोई (वय ७२, रा. भोई गल्ली, तळोदा), गालीब खालीब खाटीक (वय ५५, रा. एकविरा देवी मंदिर रोड, देवपूर, धुळे), गुलशन गालीब खाटीक (वय ४०, रा. एकविरा देवी मंदिर रोड, देवपूर, धुळे), रंजीता प्रशांत सावंत (वय ४२, रा. १०/अ एकविरा पार्क, देवपूर, धुळे) यांच्या गंभीर दुखापतीस व आयशरमधील विक्रम भिकन पाटील (रा. जुनवणे, ता. जि. धुळे) याच्या दुखापतीस कारणीभूत झाला. याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गुलाब ठाकरे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.