Dhule Crime News : सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह साडेचार लाखांवर डल्ला; अमराळे येथे 2 ठिकाणी घरफोडी

Dhule Crime : रात्री अकराच्या सुमारास चोरट्यांनी दोन घरांतून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड अशा एकूण चार लाख ३५ हजार रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला.
Items thrown by thieves in Gajanan Behere's house.
Items thrown by thieves in Gajanan Behere's house.esakal
Updated on

Dhule Crime News : अमराळे (ता. शिंदखेडा) येथे बुधवारी (ता. १२) रात्री अकराच्या सुमारास चोरट्यांनी दोन घरांतून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड अशा एकूण चार लाख ३५ हजार रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला. गुरुवारी (ता. १३) दुपारी शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्ह्य दाखल करण्यात आला. अमराळे येथील शेतकरी गजानन सदाशिव बेहेरे (वय ३५) बुधवारी रात्री जेवण करून घराचे दरवाजे नेहमीप्रमाणे अर्धवट उघडे ठेवून पत्नी, बाळासह हॉलमध्ये झोपले होते. ( Four lakhs stolen along with gold and silver jewellery in amarale)

गुरुवारी पहाटे पाचला शेवटचे रूममध्ये पाहिले असता तेथील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. पेट्यांतील सोन्या-चांदाचे दागिने व रोकड चोरी झाल्याचे दिसले. कपाट उघडे दिसले व त्यातील वस्तू जमिनीवर पडलेल्या होत्या. या ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, ३० हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, २७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे टोंगल व काप ३० हजारांचे, चांदीचे ब्रेसलेट व ७० हजार रुपयांची रोकड आणि किरण शांतिलाल बोरसे यांच्या घरातील मधल्या खोलीत ठेवलेल्या पत्र्याच्या तीन कोट्यांतील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड दिसून आले नाही.

Items thrown by thieves in Gajanan Behere's house.
Dhule Crime News : 7 जणांना न्यायालयीन, तर 4 जणांना पोलिस कोठडी; शंभर-दीडशे जणांनी केला होता हल्ला

२१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडल सात ग्रॅम, नऊ हजार रुपये किमतीची सोन्याचे कानातील झुंबर तीन ग्रॅम व एक लाख ४० हजार रुपये असे दोन्ही मिळून चार लाख ३५ हजार रुपयांची चोरी झाल्याचा गुन्हा शिंदखेडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर तपास करीत आहेत.

Items thrown by thieves in Gajanan Behere's house.
Dhule Crime News : बंदूक घेऊन हिंडणारे दोघे झटापटीनंतर पळाले! लळिंग कुरणातील घटना; शोध सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.