Dhule Fraud Crime : माउली मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीद्वारे ठेवीदाराची फसवणूक; 6 जणांविरुद्ध गुन्हा

Crime News : विष्णू रामचंद्र भागवत याने ठेवीची मुदत पूर्ण झाल्यावर पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच शिरूड येथील कार्यालय बंद करून कर्मचारी पसार झाले.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

Dhule Fraud Crime : आकर्षक व्याजदरासह विविध प्रकारची प्रलोभने देत ठेवीदाराच्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नाशिक येथील श्री माउली मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सहा संचालकांवर धुळे तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. (Dhule Crime Fraud of depositors by Mauli Multistate Credit Society)

Fraud Crime
Nagpur Crime : सूनच निघाली सासऱ्याच्या हत्येची ‘मास्टरमाइंड’; ३०० कोटींच्या संपत्तीसाठी दिली सुपारी

रवींद्र शंकरराव पवार (रा. एकवीरानगर, नकाणे रोड, देवपूर, धुळे) यांच्या फिर्यादीनुसार संशयित विष्णू रामचंद्र भागवत याने माउली मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या (नाशिक) माध्यमातून ठेवीदारांना आकर्षक व्याजासह विविध प्रेक्षणीयस्थळी सहली तसेच सोने-चांदी देण्याचे आमिष देत ठेवी ठेवण्यास प्रवृत्त केले.

या आमिषाला बळी पडत सोसायटीत दोन लाख ७० हजारांची गुंतवणूक केली. मात्र, ठेवीची मुदत पूर्ण झाल्यावर पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच शिरूड येथील कार्यालय बंद करून कर्मचारी पसार झाले. त्यावरून सोसायटीचा अध्यक्ष विष्णू भागवत, मुख्य अधीक्षक प्रफुल्ल निस्ताने, अभिजित येरूरकर, व्यवस्थापक सपना संदीप भागवत, प्रतिनिधी मंगला सुपडू मोरे व संदीप अशोक पाटील या संशयितांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्ह्याची नोंद झाली.

Fraud Crime
Nashik Crime: विनातारण कर्जाचे आमिष दाखवून तब्बल 204 जणांना गंडा! ‘हाक मराठी अर्बन निधी’ बँकेच्या संचालक मंडळाविरोधात गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.