Dhule Crime News : गावठी दारूअड्ड्यांवर धाडी; पावणेदोन लाखांचा साठा जप्त

Dhule Crime : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईचा बडगा उगारला आहे.
Crime
Crime esakal
Updated on

Dhule Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. धुळे तालुका, पश्चिम देवपूर, मोहाडी, साक्री, पिंपळनेर, नरडाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावठी दारूअड्ड्यांवर गुरुवारी (ता. २१) धाडी टाकून सुमारे एक लाख ७९ हजार ८९५ रुपयांचा अवैध विदेशी मद्यासह गावठी दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. (Dhule Crime Gavthi liquor stores were raided and illegal foreign liquor were seized)

धुळे तालुका पोलिसांनी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत ८६ हजार ७५० रुपयांची गावठी दारू व प्लॅस्टिक ड्रम, कॅन, गूळमिश्रित कच्चे रसायन तसेच अन्य साधने जप्त केली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पश्चिम देवपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहा हजारांची गावठी दारू व साधने जप्त केली.

साक्री पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५५ हजार ७०० रुपयांची गावठी दारू तसेच दारू पाडण्याची साधने जप्त केली. पिंपळनेर (ता. साक्री) पोलिसांच्या कारवाईत २२ हजारांची गावठी दारू, रसायने व साधने जमा करण्यात आली. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Crime
Crime: जावई दारु पिऊन द्यायचा मुलीला त्रास! वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

दोंडाईचा (ता. शिंदखेडा) पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत तीन हजार ५४५ रुपयांची अवैध विदेशी दारू व बिअर जप्त करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. नरडाणा (ता. शिंदखेडा) पोलिसांच्या कारवाईत ८०० रुपयांची हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. शिंदखेडा पोलिसांनी ५० लिटर गावठी दारू जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला.

मोहाडी पोलिसांच्या कारवाईत २० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तिची किंमत एक हजार रुपये आकारली. आगामी काळात अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा आणखी वाढणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले.

Crime
Mumbai Local Crime: धावत्या लोकलमध्ये दहा वर्षीय मुलीची छेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.