Dhule Crime News : गारमेंटच्या आडून गुटखा तस्करी; धुळे तालुका पोलिसांकडून पावणेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

Dhule Crime : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने जिल्ह्याच्या सीमावर्ती तपासणी नाक्यावर साड्या व गारमेंटच्या आडून होणारी गुटखा तस्करी रोखली.
Taluka police station team present with suspects in Gutka smuggling case.
Taluka police station team present with suspects in Gutka smuggling case.esakal
Updated on

Dhule Crime : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने जिल्ह्याच्या सीमावर्ती तपासणी नाक्यावर साड्या व गारमेंटच्या आडून होणारी गुटखा तस्करी रोखली. ट्रकसह दहा लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चालक व वाहकाला ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासणी नाक्यांवर परजिल्ह्यात ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी होत आहे. (Dhule Crime Gutka smuggling under guise of garment)

त्यानुसार रविवारी (ता. १४) पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांना सुरत (गुजरात) येथून ट्रक (एमएच ४३, ए २१६९)मधून राज्यात प्रतिबंधित गुटख्याची कुसुंब्यामार्गे मालेगावकडे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे.

अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पाटील, महादेव गुट्टे, कुणाल पानपाटील, विशाल पाटील, कुणाल शिंगाणे, धीरज सांगळे.

Taluka police station team present with suspects in Gutka smuggling case.
Crime News: दुकानांच्या तोडफोडप्रकरणी २५ ते ३० जणांवर गुन्हा

रवींद्र राजपूत यांच्या पथकाने अजनाळे (ता. धुळे) शिवारात कुसुंबा ते मालेगाव रोडवर सीमावर्ती तपासणी नाक्यावर सापळा रचला. रात्री नऊच्या सुमारास संशयित ट्रक थांबविला.

चालक वाहीद आरिफ पिंजारी व वाहक शोएब खान मुजीब खान (दोघे रा. मालेगाव, जि. नाशिक) यांनी चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकाने वाहनाची तपासणी केली असता ट्रकमध्ये साड्या व इतर गारमेंटच्या आडोशाला ठेवलेला गुटख्याचा साठा मिळाला.

Taluka police station team present with suspects in Gutka smuggling case.
Nashik Crime News: 30 लाखांचे वन्यजीवांचे अवयव जप्त! गुप्तचर संचालनालय, वनविभागाची संयुक्त कारवाई; एकास अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.