Dhule Fraud Crime : मुंबई विमानतळावरून कलीम शेख ताब्यात; कांदा व्यापारी फसवणूक प्रकरण

Dhule News : नेरच्या कांदा व्यापाऱ्याची ५८ लाखांत फसवणूक करणारा मुख्य संशयित हाती लागत नसताना तो दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली.
Kalim Shaikh
Kalim Shaikhesakal
Updated on

Dhule News : नेरच्या (ता. धुळे) कांदा व्यापाऱ्याची ५८ लाखांत फसवणूक करणारा मुख्य संशयित हाती लागत नसताना तो दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यांनी मुख्य संशयिताविरुद्ध लूक आऊट नोटीस मुंबईसह देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांना दिली. (Kalim Shaikh arrested from Mumbai airport on Onion trader fraud case)

त्यावरून दुबईला पळण्याच्या तयारीत असताना मुख्य संशयित कलीम सलीम शेख यास मुंबई विमानतळावरील ‘इमिग्रेशन’ अधिकाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. त्यास अटक झाली आहे. जिल्हा न्यायालयाने मंगळवारी (ता. २५) कामकाजानंतर मुख्य संशयित कलीम शेख यास सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाने अटकेची कारवाई केली.

कांदा व्यापाऱ्याला चुना

कांदा निर्यातीच्या व्यवसायात मोठा नफा मिळत असल्याचे आमिष दाखवून दहा जणांनी नेर येथील व्यापारी स्वप्नील संजय जयस्वाल यांना सुमारे ५८ लाखांनी फसविले. फसवणुकीचा हा प्रकार २८ एप्रिल २०२३ ते १४ मार्च २०२४ दरम्यान घडला. याप्रकरणी मुख्य संशयित कलीम सलीम शेख, सलीम फतूभाई शेख, सरजील ऊर्फ बाबा सलीम शेख (चौघे रा. दुबई व ह. मु. पीडब्लूडी रेस्ट हाऊस, रेल्वे स्टेशन रोड, शिंदे मळा.

अवनवकर गल्ली, येवला, जि. नाशिक), पिंट्या ऊर्फ प्रमोद लक्ष्मण पोळ (रा. नांदगाव रोड, येवला, जि. नाशिक), रऊफ अब्दुल रज्जाक शेख (रा. शिंदे मळा, अवनकर गल्ली, येवला), अनिल भिकन सोनवणे ऊर्फ सिंगम गोल्डी (रा. मालाड मुंबई), भिकन सोनवणे, जिजाबाई भिकन सोनवणे (रा. मलाड, मुंबई, ह. मु. शिवप्रसाद कॉलनी, धुळे) व अमोल बेडसे (रा. गंगापूर रोड, नाशिक) या दहा संशयितांविरूद्ध १४ मार्चला धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (latest marathi news)

Kalim Shaikh
Nagpur Crime : चोरट्या मार्गाने प्रतिबंधित मद्याची तस्करी;दोन आरोपींसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

नियोजनबद्ध कट

संशयितांनी नियोजनबद्ध पद्धतीने कट रचला. जयस्वाल यांचा विश्वास संपादन करीत कांदा निर्यातीच्या व्यवसायात होणाऱ्या नफ्याचे आमिष दाखवून केजीएन ओनियन एक्सपोर्ट सपीस नावाच्या फर्ममार्फत एकूण १६ कंटेनरमधील कांदा निर्यात करण्यास भाग पाडले. नंतर केवळ दोन कंटेनरमधील कांद्याचे पैसे देऊन इतर कंटेनरमधील ५८ लाख १२ हजार ९५ रुपये देण्यास टाळाटाळ केली. तसेच रक्कम देण्यासाठी वेळोवेळी बनावट धनादेश व नकली पावती देऊन आर्थिक फसवणूक केली. गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य संशयित कलीम सलीम शेख पसार होता.

दुबईला पळण्याचा बेत

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला. पसार संशयितांच्या शोधासाठी येवला, मनमाड, नाशिक, मुंबई परिसरात शोधपथक पाठवून माहिती काढण्यात येत होती. मुख्य संशयित कलीम सलीम शेख हा दुबई येथे पळून जाण्याचे बेतात असताना २४ जूनला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) येथील आप्रवास (इमिग्रेशन) अधिकाऱ्यांच्या मदतीने सहार पोलिस ठाणे (मुंबई) येथून त्याला अटक केली.

श्री. धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, महादेव गुट्टे, गयासुद्दीन शेख, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गणेश खैरनार, विलास पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Kalim Shaikh
Nagpur Crime : ईडीच्या छाप्यात अडीच कोटी रोख जप्त ;संचालकाकडून एक कोटीचे दागिने जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.