Dhule Crime News : मध्य प्रदेशातून शिरपूरमार्गे गुजरातमध्ये अवैध मद्याची वाहतूक करणारा कंटेनर सांगवी पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत सुमारे २८ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा पोलिसांच्या हाती लागला असून, दोन संशयितांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली. शिरपूरमार्गे मद्याची तस्करी सुरू असल्याची माहिती निरीक्षक पवार यांना मिळाली होती. त्यांनी सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. (Dhule Crime Liquor stock worth 28 lakh seized on highway)
२२ मार्चला सांगवी पोलिसांनी महामार्गावर पळासनेर येथे सापळा रचला. शिरपूरकडे येणारा कंटेनर (एनएल ०१, एजी ९२९५)ला थांबवून चौकशी केल्यानंतर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली. त्यात १७ लाख २८ हजार रुपये किमतीची मद्याची १२० खोकी.
सात लाख पाच हजार ६०० रुपये किमतीची व्होडकाची ४९ खोकी, चार लाख १५ हजार आठ रुपये किमतीची व्हिस्कीची १३१ खोकी असा मुद्देमाल आढळला.
मद्यसाठा आणि कंटेनरची एकूण किंमत ४८ लाख ४८ हजार रुपये आहे. संशयित चालक विजयकुमार प्रतापसिंह (वय ३२), सहचालक प्रदीपकुमार मानसिंह (३३, रा. नवा, ता. राजगड, जि. चुरू, राजस्थान) यांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक उपनिरीक्षक रफिक मुल्ला, हवालदार संतोष पाटील, संदीप ठाकरे, कैलास पवार, सुनील पाठक, योगेश मोरे, संजय भोई, स्वप्नील बांगर, भूषण पाटील, कृष्णा पावरा, मनोज पाटील यांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.