Dhule Crime News : जमावाचा पोलिसांवरच हल्ला; साक्रीत 45 जणांविरुद्ध गुन्हा

Dhule Crime : डांबून ठेवलेल्या व्यक्तीस सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. मारहाण करीत दगडफेक केली.
Crime
Crimeesakal
Updated on

Dhule Crime News : डांबून ठेवलेल्या व्यक्तीस सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. मारहाण करीत दगडफेक केली. तसेच शासकीय वाहनाचे नुकसान केले. कळंभीर (ता. साक्री) येथे ही घटना घडली. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात संशयित ४० ते ४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कळंभीर येथे १८ जुलैला सायंकाळी साडेसातच्या सुमारास डायल ११२ वर एकाने फोन केला. (Mob attack on police itself crime against 45 persons )

कळंभीर गावात मागील भांडणाच्या कारणावरून दोन समाजात वाद होऊन एका समाजाच्या व्यक्तीस डांबून ठेवले असल्याचे कळविले. नंतर साक्री पोलिस ठाण्याचे रोशन चित्ते यांच्यासह कर्मचारी कळंभीर येथे दाखल केले. डांबून ठेवलेल्या व्यक्तीस सोडविण्यास गेल्याच्या कारणावरून नंतर रात्री आठच्या सुमारास मारुती मंदिर चौकात दीपक भिल, मनोज ऊर्फ मन्या सोनवणे, जितू मालचे, रवींद्र ठाकरे, राहुल छोटू भिल, अर्जुन भीमराव भिल, आकाश भिल, भुऱ्या ऊर्फ भरत भीमराव ठाकरे, अजय भिल, योगेश ऊर्फ योग्या भिल.

Crime
Dhule Crime : शिरपुरात ‘आयजीं’च्या विशेष पथकाचा छापा; दोन लाखांची रोकड, 15 दुचाकी जप्त

भुऱ्या ऊर्फ भरत किसन वाघ, छगन काशिनाथ सोनवणे, बारकू सोनवणे, पवन सोनवणे, भरत तुळशीराम सोनवणे, मच्छिंद्र सुरेश भिल, देवेंद्र बापू भिल, मोन्या मालचे, गिजराम देवा वाघ, राहल पिंटू पगारे, राजू लक्ष्मण सोनवणे, देवदत्त लक्ष्मण सोनवणे व अन्य २० ते २५ जण (सर्व रा. कळंभीर) यांनी ठार मारण्याच्या उद्देशाने पोलिसांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगडफेक करीत जखमी केले. शासकीय कामात अडथळा निर्माण करून वाहनाचे नुकसान केले. याबाबत रोशन चित्ते यांच्या फिर्यादीनुसार ४० ते ४५ जणांविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.

Crime
Dhule Bribe Crime : सरपंच पतीसह चौघे ACBच्या जाळ्यात; फागणेचा ग्रामविकास अधिकारी, लिपिक, रोजगार सेवकाचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.