Dhule Crime News : शिरपूरला रोज कॅफेवर पुन्हा छापा; दामिनी पोलिस पथकाची कारवाई

Dhule Crime News : शहरातील करवंद रस्त्यावरील रोज कॅफेवर शहर पोलिस ठाण्याच्या दामिनी पथकाने छापा टाकत अश्लील चाळे करणाऱ्या युगुलाला ताब्यात घेतले.
Crime
Crimeesakal
Updated on

Dhule Crime News : शहरातील करवंद रस्त्यावरील रोज कॅफेवर शहर पोलिस ठाण्याच्या दामिनी पथकाने छापा टाकत अश्लील चाळे करणाऱ्या युगुलाला ताब्यात घेतले. कॅफेमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कॅफेवर ही सलग दुसरी कारवाई आहे. दामिनी पथकाच्या प्रमुख उपनिरीक्षक छाया पाटील यांना रोज कॅफेमधील प्रकाराबाबत माहिती मिळाली होती. त्यांच्यासह शिपाई रोशनी पाटील व सहकाऱ्यांनी रोज कॅफेवर छापा टाकला. (Damini team of city police station raided Rose Cafe in Shirpur)

तेथे एका कप्प्यात युवक-युवती अश्लील चाळे करीत असल्याचे आढळले. त्यांना छाया पाटील यांनी समज देऊन सोडून दिले. कॅफेमालक तुषार प्रभाकर बारी (वय २५, रा. आदर्शनगर, शिरपूर) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या कॅफेवर काही दिवसांपूर्वीच छापा टाकून काही युगुलांना ताब्यात घेण्यात आले होते. छाप्यात कॅफेमध्ये छोटे कप्पे तयार करून आक्षेपार्ह कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे आढळले होते. तुषार बारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Crime
Pune Crime News : कोंढव्यात मद्यपीकडून पत्नीवर ब्लेडने वार

पाच ते सात महाविद्यालये असलेल्या या भागात युवक-युवतींची मोठी गर्दी असते. कॅफेच्या नावाखाली युवक-युवतींना एकांत उपलब्ध करून दिला जात असून, त्याचे तासांवर भाडे आकारले जाते. या पार्श्वभूमीवर कॅफेमध्ये गंभीर गुन्हे घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

"ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार चालतात, तेथे कारवाई केली जाते. नागरिकांनी सजग राहावे. आपल्या परिसरात असे प्रकार सुरू असतील तर दामिनी पथकाशी संपर्क साधावा. मुलींना सुरक्षितता मिळवून देणे हे पथकाचे प्रमुख लक्ष्य आहे. पालकांनीही आपापल्या मुला-मुलींकडे लक्ष देण्याची गरज आहे. दामिनी पथकाची कारवाई सुरू ठेवली जाणार आहे."- छाया पाटील, पोलिस उपनिरीक्षक

Crime
Pune Crime News : बाराशे कोटींचे मेफेड्रोन जप्त ; पुण्यातील विश्रांतवाडी, दौंडमधील कुरकुंभ येथे कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.