Dhule Crime News : विकास प्रकल्पांबाबत नोडल ऑफिसर नियुक्त; ऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरी प्रकरणी अटकसत्र सुरू

Crime News : राज्यासह जिल्ह्याची हानी करणाऱ्या या घटनेप्रकरणी ‘सकाळ’ने मेच्या सुरवातीस ‘विकासाची परवड’ या विशेष मालिकेंतर्गत यंत्रणेला गांभीर्य लक्षात आणून दिले.
Police officers and a team along with the accused arrested in the case of theft of copper cable from a development project.
Police officers and a team along with the accused arrested in the case of theft of copper cable from a development project.esakal
Updated on

Dhule Crime News : राज्यातील विजेचा तुटवडा भरून काढणाऱ्या निजामपूर माळमाथा, शिवाजीनगर (ता. साक्री) येथील पवनऊर्जा आणि सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांना कॉपर केबल चोरीच्या प्रकाराची दृष्ट लागली. राज्यासह जिल्ह्याची हानी करणाऱ्या या घटनेप्रकरणी ‘सकाळ’ने मेच्या सुरवातीस ‘विकासाची परवड’ या विशेष मालिकेंतर्गत यंत्रणेला गांभीर्य लक्षात आणून दिले.

त्याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कठोर पवित्रा घेत निजामपूर पोलिस ठाण्याद्वारे चोरट्यांचे अटकसत्र सुरू केले आहे. तसेच दहा ते पंधरा वर्षांत दाखल गुन्ह्यांची जंत्री काढून त्यातील गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाईचा निर्णय श्री. धिवरे यांनी घेतला आहे. (Dhule Arrest session started in case of theft of copper cable in power plant)

निजामपूर माळमाथा, शिवाजीनगर (ता. साक्री) भागात अडीच हजार कोटींहून अधिक गुंतवणुकीचे पवनऊर्जा आणि सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प आहेत. त्यातील किमती कॉपर केबलवर गुन्हेगारी टोळ्यांचा डोळा असतो. केबल विक्रीतून चांगला पैसा मिळत असल्याने टोळ्या वाढत गेल्या. स्थानिक पोलिसांचा वचक नसल्याने सहा ते आठ टोळ्या सक्रिय आहेत. त्या कॉपर केबलची सतत चोरी करत असल्याने राज्याची मोठी हानी होत असते. जिल्ह्याच्या प्रतिमेस तडा जात असतो.

नोडल ऑफिसर नियुक्त

‘सकाळ’ने या वास्तव स्थितीकडे लक्ष वेधल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी लागलीच कॉपर केबल चोरी प्रकरणी कठोर पवित्रा घेत निजामपूर पोलिस ठाण्याला खडसावले. नंतर गुन्हेगारी टोळीला जरब बसण्यासाठी अटकसत्र सुरू झाले. दहा ते पंधरा वर्षांत कॉपर केबल चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी किती, अटक झालेले आणि न झालेले किती, सातत्याने गुन्हेगारी करणाऱ्यांवर एमपीडीए किंवा मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर झाला किंवा नाही, किती आरोपी अज्ञात दाखविण्यात आले, त्यामागचे कारण काय, असे गंभीर प्रश्‍न उपस्थित करत त्याचा अहवाल तयार करण्यासाठी श्री. धिवरे यांनी नोडल ऑफिसरची नियुक्ती केली आहे. (latest marathi news)

Police officers and a team along with the accused arrested in the case of theft of copper cable from a development project.
Pune Crime : पुण्यात ३२ हॉटेलना अखेर टाळे;उत्पादन शुल्क विभागाकडून तीन दिवसांत कारवाया

सुरक्षावाढीचेही निर्देश

ऊर्जा प्रकल्प परिसरात सुरक्षाव्यवस्था वाढविण्याचे निर्देशही प्रकल्प व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत. यात उच्चप्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, ठिकठिकाणी प्रवेश निषेध फलक लावण्याची सूचना आहे. संबंधित कंपनीने प्रशिक्षित सिक्युरिटी एजन्सीमार्फत अधिकृत सुरक्षारक्षक नेमावेत.

महाराष्ट्र सुरक्षा बलाकडून सुरक्षा घ्यावी. सुरक्षा रक्षकाची पोलिस पडताळणी, त्यांची वैद्यकीय तपासणी करावी. रात्रगस्तीच्या सुरक्षारक्षकांकडे बॅटरी सक्तीची करावी. पॉवर प्लांट परिसरात सिक्युरिटी एजन्सीमार्फत सतर्कतेने गस्ती घालावी, अशी सूचना आहे.

अटकसत्र सुरूच

मेच्या दुसऱ्या आठवड्यात निजामपूर पोलिस ठाण्याने आरोपी सुखदेव आधार मालचे, सुनील ऊर्फ भंगा अशोक सोनवणे, जिभाऊ दाजमल बागूल (सर्व रा. टेंभे, ता. साक्री) यांनी अटक केली होती. यापूर्वी अटक आरोपींकडून दोन लाख २५ हजारांवर किमतीचा सुझलॉन कंपनीचा कॉपर केबल व चार्जिंग कटर जप्त करण्यात आले. नंतर १५ मेस कॉपर केबल चोरीमधील आरोपी प्रकाश नागू सोनवणे, धनराज हरी सोनवणे, भरत संतोष अहिरे, श्रावण भालचंद्र मालचे, दगडू रामसिंग मगरे (सर्व रा. वासदरे, ता. साक्री) यांनाही अटक झाली होती.

"कॉपर केबल चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी निजामपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एच. एल. गायकवाड यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत कार्यवाहीची सूचना दिली आहे. या प्रकरणी कुठल्याही आरोपीची गय केली जाणार नाही. नोडल ऑफिसरचा अहवाल प्राप्त झाल्यावर अधिक वेगाने अटकसत्र सुरू केले जाईल. गुन्हेगारांवर अत्यंत कठोर कारवाईचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला जाईल."

- श्रीकांत धिवरे, जिल्हा पोलिस अधीक्षक, धुळे

Police officers and a team along with the accused arrested in the case of theft of copper cable from a development project.
Pune Crime : विमाननगरमधील दोन पब सील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.