Dhule Crime: वाइन शॉप मालक, मॅनेजर, सेल्समनवर गुन्हा; धुळ्यात मद्यविक्रीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर केल्याने कारवाई

Crime News : देवपूर पोलिस ठाणे हद्दीतील महाराष्ट्र वाइन शॉप व आझादनगर पोलिस ठाणे हद्दीतील क्वालिटी वाइन शॉप येथे बेकायदेशीरपणे १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मद्यविक्री करताना आढळून आले
Wine Shop Police Action
Wine Shop Police Actionesakal
Updated on

Dhule Crime : शहरातील दोन वाइन शॉपवर अल्पवयीन मुले मद्यविक्री करताना आढळून आल्याने या प्रकरणी महाराष्ट्र व क्वालिटी वाइन शॉपचे मालक, मॅनेजरसह सेल्समवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. (Dhule Action for using minors to sell liquor marathi news)

बेकायदेशीरपणे कुठलीही खातरजमा न करता १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मद्यविक्री करताना आढळून येईल, अशा मद्यविक्री दुकानाचे चालक व मालकावर कारवाई करण्याचे वरिष्ठांनी आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास धुळे शहर उपविभागातील धुळे शहर पोलिस ठाणे हद्दीतील चितोड रोडवरील वाइन शॉप, महापालिकेसमोरील वाइन शॉप, चाळीसगाव रोड पोलिस ठाणे हद्दीतील पूनम व सत्यम वाइन शॉप, मोहाडी पोलिस ठाणे हद्दीतील श्रद्धा वाइन शॉप, राजेश व नियती बिअर बार, पश्चिम देवपूर पोलिस ठाणे हद्दीतील नकाणे रोडवरील वाइन सेंटर, वाइन शॉप, देवपूर पोलिस ठाणे हद्दीतील महाराष्ट्र वाइन शॉप, आझादनगर पोलिस ठाणे हद्दीतील क्वालिटी वाइन शॉपची संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी तपासणी केली. (latest marathi news)

Wine Shop Police Action
Crime News: एनएसयूआयच्या पुणे विद्यापीठ अध्याक्षाविरोधात गुन्हा; विद्यार्थिनीचा केला छळ

या शॉप्सवर कारवाई

त्यात देवपूर पोलिस ठाणे हद्दीतील महाराष्ट्र वाइन शॉप व आझादनगर पोलिस ठाणे हद्दीतील क्वालिटी वाइन शॉप येथे बेकायदेशीरपणे १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मद्यविक्री करताना आढळून आले. त्यानुसार देवपूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र वाइन शॉपचालक जगदीश प्रधानमल गलाणी, नोकर ऋतिक भरत शर्मा, मालक वीणा जगदीश गलाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच आझादनगर पोलिस ठाण्यात क्वालिटी वाइन शॉपचे मॅनेजर चुनीलाल मंगतराम सेवाणी, सेल्समन विक्की किशनचंद लुंड यांच्याविरुद्धदेखील गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी यांनी व त्यांच्या आदेशाने आझादनगर पोलिस ठाणे येथील प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच देवपूर पोलिस ठाणे येथील प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली.

Wine Shop Police Action
Ahmednagar Crime : महिला पोलिसांना महिलेकडून मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.