Dhule Crime News : वार येथील खूनप्रकरणी एकाला जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा निकाल

Crime News : ज्ञानेश्वरने १९ मार्च २०२१ ला आत्माराम पारधी यांना मंदिरात एकटे गाठत मागून धारदार हत्याराने त्यांचा खून केला.
Court Order
Court Orderesakal
Updated on

Dhule Crime News : वार (ता. धुळे) येथे आजोबांच्या खुनात सहभाग असल्याच्या संशयावरून ७० वर्षीय वृद्धाचा धारदार हत्याराने खून केल्याच्या घटनेत धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस आजन्म करावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्या. डी. एस. आहेर यांनी हा निकाल दिला. (life imprisonment in case of murder in Vaar)

वार (ता. धुळे) येथे २००६ मध्ये भाईदास उखडू पारधी यांचा खून झाला. या खुनाच्या गुन्ह्यात आत्माराम हिरामण पारधी (वय ७०) यांचा हात असल्याचा संशय मृत भाईदास पारधी यांचा नातू ज्ञानेश्वर दगडू पवार (पारधी) याला होता. यावरून ज्ञानेश्वर हा आत्माराम व त्यांच्या कुटुंबीयांशी नेहमी भांडण करून वाद घालत होता.

त्यानंतर ज्ञानेश्वरने १९ मार्च २०२१ ला आत्माराम पारधी यांना मंदिरात एकटे गाठत मागून धारदार हत्याराने त्यांचा खून केला. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात शांताराम आत्माराम पारधी यांच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर पवार (पारधी) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. (latest marathi news)

Court Order
Dhule Crime News : धुळ्यात पावणेतीन लाखांचा गांजा जप्त! एलसीबीच्या कारवाईत मध्य प्रदेशातील संशयिताला अटक

या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याकडे होता. आरोपपत्र दाखल झाल्यावर या प्रकरणी धुळे जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू होता. यात एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. रंगकाम करणारे प्रत्यक्षदर्शी प्रभाकर चव्हाण यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. अजय सानप यांनी प्रभावी युक्तिवाद करत संशयितास कठोर शिक्षेची मागणी केली. सरकार पक्षाचे वकील व आरोपीचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून घेत न्या. डी. एस. आहेर यांनी ज्ञानेश्वर दगडू पवार (पारधी) याला आजन्म कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा सुनावली.

Court Order
Nashik Crime News : दारूच्या नशेत मित्राचा खून! देवळा पोलिस ठाण्यासमोर तणाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.