Dhule Crime News : किराणा दुकानदाराच्या घरावर छापा

Dhule Crime : एका किराणा दुकानदाराच्या घरावर छापा टाकून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन लाखांचा सुगंधित पानमसाला आणि तंबाखू जप्त केली.
Crime
Crime esakal
Updated on

Dhule Crime News : शहरातील साक्री रोडवरील कुमारनगरात एका किराणा दुकानदाराच्या घरावर छापा टाकून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन लाखांचा सुगंधित पानमसाला आणि तंबाखू जप्त केली. या प्रकरणी संशयित दुकानदाराला ताब्यात घेतले. राज्यात प्रतिबंधित गुटखा पानमसाल्याची शहरासह जिल्ह्यात विक्रीच्या उद्देशाने तस्करी केली जात असल्याने पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना कारवाईचे निर्देश दिले. (Dhule Crime Raid on grocery shopkeeper house Gutkha worth 2 lakh seized)

या अनुषंगाने पोलिस निरीक्षक शिंदे यांनी तपास सुरू केला. साक्री रोड येथे राकेश भारतलाल रेलन (रा. ब्लॉक क्रमांक जी ३, रूम क्रमांक ५, कुमारनगर, साक्री रोड, धुळे) याने त्याच्या घरी गुटख्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केल्याची माहिती मिळाली.

एलसीबी पथकाने कुमारनगरातील राकेश रेलन या किराणा दुकानदाराच्या घरावर छापा टाकला. घरात दोन लाख ९ हजार ३१६ रुपयांचा अवैध गुटखा साठा आढळला. पोलिसांनी माल जप्त केला.

Crime
Mumbai Crime: मंदिरा जवळ भटक्या श्‍वानांना खाऊ घातले मांस; गुन्हा दाखल

संशयित राकेश रेलन याला ताब्यात घेत त्याच्याविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिंदे, श्रीकृष्ण पारधी, बाळासाहेब सूर्यवंशी.

संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील, संतोष हिरे, तुषार सूर्यवंशी, प्रकाश सोनार, देवेंद्र ठाकूर, कैलास महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Crime
Nagpur Crime: महिलेच्या विनयभंगाच्या आरोपाखाली कुटुंबाला पाठवलं तुरुंगात, चोरट्यांनी घरात शिरुन उडवले १७ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.