Dhule Crime News : धुळ्यात रस्तालूट करणारी टोळी गजाआड! पावणेसात लाखांची रोकड हस्तगत

Dhule News : एका व्यावसायिकाच्या दुचाकीला लाथ मारून, त्यास जखमी करत डिक्कीतील सुमारे ११ लाखांची रोकड हिसकावून नेणाऱ्या टोळीला एलसीबीच्या पथकाने बुधवारी (ता. २४) गजाआड केले.
Officers and action team present during the inspection of the suspect belonging to the road looting gang.
Officers and action team present during the inspection of the suspect belonging to the road looting gang.esakal
Updated on

Dhule News : नागपूर-सुरत महामार्गावर फागणे (ता. धुळे) गावाजवळ १८ जुलैला सायंकाळी एका व्यावसायिकाच्या दुचाकीला लाथ मारून, त्यास जखमी करत डिक्कीतील सुमारे ११ लाखांची रोकड हिसकावून नेणाऱ्या टोळीला एलसीबीच्या पथकाने बुधवारी (ता. २४) गजाआड केले. संशयितांकडून लुटीतील पावणेसात लाखांची रोकड हस्तगत केली. टोळीतील एक संशयित फरारी आहे. (Dhule Crime Road robbery gang is on arrest)

किशोर पंढरीनाथ पाटील (वय ४४, रा. हिंगोणे, ह. मु. पी. एस. नगर, धरणगाव, जि. जळगाव) व अतुल लक्ष्मीनारायण काबरा यांनी १८ जुलैला धुळ्यात सोयाबीनची विक्री केली. त्यात सोयाबीची रक्कम दहा लाख ९१ हजार ९०० रुपये दुचाकीच्या (एमएच १९ बीई १८०७) डिक्कीत ठेऊन ते धरणगावकडे जात होते.

सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अमळनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर फागणे (ता. धुळे) शिवारात दोन तरुण दुचाकीवरून पाटील, काबरा यांच्या दुचाकीजवळ आले. यातील एकाने ‘तू माझ्या बहिणीचे नाव का घेतले’, असे कारण सांगून धमकावण्यास सुरुवात केली. तसेच दुसऱ्या तरुणाने पाटील, काबरा यांच्या दुचाकीला लाथ मारून त्यांना खाली पाडले. त्यात दोघे जखमी झाले.

संशयास्पद हालचाली

दुचाकीच्या डिक्कीतील सर्व रोकड हिसकावून नेली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. भररस्त्यावर व्यावसायिकाची लूट झाल्याच्या या प्रकरणाचा तपास एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी हाती घेतला. त्यांच्या पथकाने शहरातील जे. बी. रोड ते घटनास्थळापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर दोन तरुण जाताना दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने तपासाची चक्रे फिरवली. (latest marathi news)

Officers and action team present during the inspection of the suspect belonging to the road looting gang.
Dhule Crime News : चोरट्यांची टोळी शिताफीने गजाआड! एलसीबीकडून 9 लाखांच्या 18 दुचाकी जप्त

यात श्री रत्न ट्रेडींग येथे कामावर असलेला यश विश्वनाथ ब्रह्मे (रा. पवननगर, चाळीसगाव रोड, धुळे) याच्या हालचाली संशयास्पद निदर्शनास आल्याने त्याची विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हा गुन्हा राहुल अनिल नवगिरे (पवननगर, चाळीसगाव रोड, धुळे, फरारी), चंद्रकांत रवींद्र मरसाळे (रा. मनोहर टॉकिजच्या मागे, धुळे), कल्पेश श्याम वाघ (रा. पवननगर हुडको, चाळीसगाव रोड, धुळे), राहुल श्याम वाघ, (रा. पवननगर, हुडको) व सनी संजय वाडेकर (रा. मनोहर टॉकिजच्या मागे, धुळे) यांनी कट रचून केल्याची माहिती उघड झाली.

`कोर्ड वर्ड`चा वापर

व्यावसायिक किशोर पाटील हे सोयाबीन विक्रीची दहा लाख ९१ हजार ९०० रुपयांची रोकड श्री रत्न ट्रेडिंग येथून घेऊन धरणगावकडे जाण्यास निघाल्याचा राहुल नवगिरे याला त्याच्या मोबाईलवर ‘एक घोडा दो दुल्हे निकल गये’ असे कोडवर्डच्या माध्यमातून बोलून संशयितांनी वेगवेगळ्या दुचाकींवर ठिकठिकाणी थांबून पाटील यांच्या दुचाकीचा पाठलाग केला होता. एलसीबी पथकाने फरार संशयित नवगिरे वगळता उर्वरित पाच जणांच्या टोळीला अटक केली.

त्यांच्याकडून सहा लाख ८४ हजार हस्तगत केले. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, संजय पाटील, पंकज खैरमोडे, शशिकांत देवरे, रविकिरण राठोड, सुशील शेंडे, नीलेश पोतदार, गुणवंत पाटील तसेच धुळे तालुका पोलिस ठाण्याचे किशोर खैरनार, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील यांनी ही कारवाई केली.

Officers and action team present during the inspection of the suspect belonging to the road looting gang.
Dhule Crime News : खूनप्रकरणी एकाला जन्मठेप! धुळे सत्र न्यायालयाचा निकाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com