Dhule Crime: गुंगीकारक औषधांची कारमधून विक्री! LCBकडून एकाला अटक; पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News : गुंगीकारक औषधांची कारमधून विक्री करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. ६) अटक केली.
Superintendent of Police Shrikant Dhiware, Additional Superintendent of Police Kishore Kale and LCB team along with the accused and the suspect arrested in the case of sale of intoxicating drugs.
Superintendent of Police Shrikant Dhiware, Additional Superintendent of Police Kishore Kale and LCB team along with the accused and the suspect arrested in the case of sale of intoxicating drugs.esakal
Updated on

धुळे : गुंगीकारक औषधांची कारमधून विक्री करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. ६) अटक केली. त्याच्याकडून गुंगीच्या औषधांसह पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. (Dhule Crime Sale of drugs from cars LCB marathi news)

शहरातील डबीर शेख रफियोद्दीन शेख (रा. पूर्व हुडको, चाळीसगाव रोड, धुळे) सुरत महामार्गावर मोराणे शिवारातील एका हॉटेलच्या परिसरात त्याच्या वाहनामधून गुंगीकारक औषधे विकत असल्याची माहिती ‘एलसीबी’ला मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्यासह पथकाने मोराणे परिसरात शोध सुरू केला.

एका हॉटेलसमोरील रस्त्यावर कार (एमएच ०६/एबी १९८३)जवळ एक जण संशयास्पदरीत्या दिसला. पथकाने छापा टाकून त्याला पकडले. त्याने डबीर शेख असे त्याचे नाव सांगितले. वाहनाची तपासणी केली असता त्यात ७२ हजार रुपये किमतीच्या गुंगीकारक औषधाच्या ४८० सीलबंद बाटल्या आढळून आल्या. (Latest Marathi News)

Superintendent of Police Shrikant Dhiware, Additional Superintendent of Police Kishore Kale and LCB team along with the accused and the suspect arrested in the case of sale of intoxicating drugs.
Crime News: अल्पवयीन मुलीवर पेल्हारमध्ये अत्याचार; पोलिसांनी ५ तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

पथकाने संशयित डबीरला अटक करून कारसह एकूण तीन लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पारधी, अमित माळी, प्रकाश पाटील, संजय पाटील, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड, गुणवंत पाटील, नीलेश पोतदार, सुशील शेंडे, कैलास महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Superintendent of Police Shrikant Dhiware, Additional Superintendent of Police Kishore Kale and LCB team along with the accused and the suspect arrested in the case of sale of intoxicating drugs.
Crime News: चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.