Dhule Crime : शिरपूर शहर पोलिसांकडून एकाच दिवसांत 3 गुन्ह्यांची उकल; 10 वर्षांपासून फरारी संशयिताला अटक

Crime News : दहा वर्षांपासून फरारी संशयिताला अटक करण्याची कामगिरी बजावली. त्याबद्दल वरिष्ठांकडून पथकाचे कौतुक करण्यात आले.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

शिरपूर : शहर पोलिस ठाण्याच्या शोध पथकाने एकाच दिवसात दोन गुन्हे उघडकीस आणण्यासह दहा वर्षांपासून फरारी संशयिताला अटक करण्याची कामगिरी बजावली. त्याबद्दल वरिष्ठांकडून पथकाचे कौतुक करण्यात आले. (Dhule Crime Shirpur city police solved 3 crimes in single day)

चोरीप्रकरणी अटक

चालक झोपी गेल्याची संधी साधून कारमधून रोकड आणि मोबाईल चोरल्याच्या गुन्ह्यात शहर पोलिस ठाण्याच्या शोध पथकाने एकाला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. रविवारी (ता.२३) रात्री ही घटना घडली होती. धनराज भगवान पवार (वय २६, रा.वरला, मध्य प्रदेश) येथील इंदिरा गांधी रुग्णालयासमोर रस्त्यावर कार (एमएच ४८, सीबी ४९३९) उभी करून झोपी गेला होता.

ही संधी साधून कारचा दरवाजा उघडून डॅशबोर्डच्या कप्प्यात ठेवलेले तीन हजार रुपये रोख आणि २५ हजार रुपये किमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल अज्ञात संशयिताने चोरला होता. पवार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल होता. निरीक्षक के.के.पाटील यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

शोध पथकाने माग काढला असता त्याच परिसरातील संशयिताने चोरी केल्याचे माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी संशयित आकाश तथा रितिक चंदू माळी (रा. गवळीवाडा, शिरपूर) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर चोरीच्या मुद्देमालापैकी अडीच हजार रुपये आणि मोबाईल त्याने काढून दिला.

फरारी संशयिताला अटक

दंगल आणि मारहाणीच्या गुन्ह्यात दहा वर्षांपासून फरार असलेल्या संशयिताला शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली. सुनील तथा सुन्या सुरशा भिल (वय २९, रा. सुंदरवाडी, वरवाडे, शिरपूर) असे संशयिताचे नाव आहे. तो दहा वर्षांपासून गुन्हा केल्यानंतर फरार होता. त्याचा शोध सुरू होता. दरम्यान शहर पोलिसांना संशयित कळमसरे (ता. शिरपूर) गावात आल्याची माहिती मिळाली. शोध पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. (latest marathi news)

Crime News
Sambhaji Nagar Crime : मद्यधुंद दोन तरुणांची भरचौकात तलवारबाजी;सिडको येथे वाहनधारकांत दहशत

चोरीच्या सहा दुचाकी जप्त

चोरी केल्यानंतर शहराजवळ शनी मंदिर परिसरात दडवून ठेवलेल्या पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. या कारवाईनंतर शहरातील व देवपूर (धुळे) येथील चोरीचे प्रत्येकी दोन गुन्हे उघडकीस आले. मध्य प्रदेशातील शहापूर (ता. सेंधवा) येथील राकेश दूरसिंग बर्डे यांच्या मालकीची दुचाकी शहरातील पाटील वाडा येथून बालाजी मंदिराकडे जाणाऱ्‍या रस्त्यावर उभी केली असता चोरीस गेली होती.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना शिरपूर फाटा परिसरात संशयित दुचाकीवर फिरताना आढळला. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने शिरपुरातून दुचाकी चोरल्याची माहिती दिली. संशयित गोपाल देविदास पाटील (रा. धुळे) सराईत गुन्हेगार असल्याच्या संशयावरून पोलिसांनी सखोल तपास केला. संशयिताने दुचाकी चोरून शहराजवळ शनी मंदिर परिसरात दडवून ठेवल्याची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळावरून सहा दुचाकी जप्त केल्या. त्यातील दोन दुचाकी चोरीबाबत शिरपूर तर अन्य दोन दुचाकींबाबत देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. निरीक्षक के.के.पाटील, शोध पथकाचे हवालदार ललित पाटील, नाईक रवींद्र आखडमल, विनोद आखडमल, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, प्रशांत पवार, भटू साळुंखे, आरिफ तडवी, सचिन वाघ, मनोज महाजन व मनोज दाभाडे यांनी ही कामगिरी बजावली.

Crime News
Pune Crime News : बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या वडिलांचा खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.