Dhule Crime News : कैलासनगरात चोरट्यांचा उच्छाद; एकाच रात्री 2 ठिकाणी घरफोडी

Dhule Crime : शहरातील चितोड रोडवरील स्मशानभूमीलगतच्या कैलासनगरात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केली.
Hand Sanitized Cupboards in Kailasnagar.
Hand Sanitized Cupboards in Kailasnagar.esakal
Updated on

Dhule Crime News : शहरातील चितोड रोडवरील स्मशानभूमीलगतच्या कैलासनगरात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केली. उशिरापर्यंत दोन्ही घटनांची पोलिस दप्तरी झाली नव्हती. प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी रोकडसह दागिने, असा लाखोंचा ऐवज लंपास केल्याचा अंदाज आहे. दरम्यान, महापालिकेच्या बंद पथदीपांमुळे आणि परिसरात पोलिसांची रात्री गस्तही नसल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ( Thieves in Kailash Nagar house burglaries in 2 places in one night)

चितोड रोडवरून लीलाबाई चाळजवळच्या कैलासनगरातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील महापालिकेचे अनेक पथदिवे बंद आहेत. परिसरात रात्री विजेचा लपंडाव सुरू असतो. ही संधी साधून चोरट्यांनी एकाच रात्री दोन ठिकाणी धाडसी घरफोडी केली. कैलासनगरातील मंगल गणपत उमाळे हे मार्केट यार्डमध्ये हमाली करतात. त्यांचा परिवार पालघर येथे मुलीकडे गेला होता.

Hand Sanitized Cupboards in Kailasnagar.
Dhule Crime : पाण्याच्या बाटल्यांआड बनावट दारूची वाहतूक! LCB च्या कारवाईत साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

उमाळे मार्केटमध्ये कामावर होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. ही संधी साधून चोरट्यांनी रात्रीतून घराच्या दरवाजाच्या कडीचे स्क्रू कापून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून दोन तोळे सोन्याची माळ, २० भार चांदीचे दागिने व अडीच ते पाच हजारांची रोकड असा मुद्देमाल नेला. चोरट्यांनी नंतर मोर्चा सुरेश फुलचंद भावसार (रा. प्लॉट क्रमांक १७६, कैलासनगर) यांच्याकडे वळविला.

भावसार हे उकाड्यामुळे घराला कुलूप लावून परिवारासह छतावर झोपले असताना चोरट्यांनी दगडाच्या सहाय्याने घराचे कुलूप तोडून गल्ल्यातील चार ते पाच हजारांची चिल्लर लंपास केली. सकाळी हमाल उमाळे कामावरून घरी परतल्यावर, तर भावसार यांना सकाळी जाग आल्यावर घरफोडी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Hand Sanitized Cupboards in Kailasnagar.
Dhule Crime News : अमली पदार्थ तस्करी प्रकरणी 29 अटकेत; दाखल 21 गुन्ह्यात 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.