Dhule News : बोराडी (ता. शिरपूर) येथील एटीएम मशिन उखडून काढत पळवून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याच्या संशयावरून सांगवी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या प्रयत्नात वापरलेली क्रूझरदेखील जप्त करण्यात आली. अन्य तीन संशयित फरारी असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Three arrested in ATM theft attempt in shirpur)
१९ जुलैच्या मध्यरात्री अडीचला बोराडी बसस्थानकासमोर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमधून एटीएम मशिन क्रूझरला बांधून संशयितांनी उखडून काढले होते. त्या वेळी मोठा आवाज होऊन घरमालक जगताप यांना जाग आली. त्यांनी आरडाओरड केल्याने संशयित वाहनात बसून फरारी झाले होते. एसबीआय एटीएमचे सेवा पुरवठादार प्रवीण पाठक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असा लागला छडा
या गुन्ह्याचा तपास सांगवी पोलिसांनी प्रतिष्ठेचा केला. संशयितांच्या वर्णनावरून ते स्थानिक असल्याचा अंदाज होता. निरीक्षक जयपाल हिरे यांनी खबऱ्यांचे जाळे तैनात केले. गुन्ह्यात वापरलेली क्रूझर हा एक महत्त्वाचा दुवा होता. महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागात तपास करीत असताना गुन्ह्यातील क्रूझरच्या वर्णनाशी मिळतीजुळती क्रूझर खंबाळे (ता. शिरपूर) येथे असल्याचा छडा बीट अंमलदार कैलास जाधव व शिपाई मनोज नेरकर यांनी लावला.
वरिष्ठांकडून कौतुक
या गंभीर गुन्ह्याचा यशस्वी तपास केल्यामुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे व डीवायएसपी भागवत सोनवणे यांनी सांगवी पोलिसांचे कौतुक केले. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक कैलास जाधव, हवालदार संतोष पाटील, राजू ढिसले, संदीप ठाकरे, अनिल चौधरी, संजय भोई, योगेश मोरे, मनोज नेरकर, भूषण पाटील, स्वप्नील बांगर, सागर कासार यांनी ही कामगिरी बजावली. (latest marathi news)
...अन् संशयित चतुर्भुज
संशयित वाहनाचे मालक मगन पवार यांना सांगवी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. त्यांनी मजूर वाहतुकीसाठी वाहन वापरात असून, अधूनमधून मुलगा योगेश क्रूझर घेऊन जात असल्याचे सांगितले. योगेश पवार याला ताब्यात घेऊन कसून विचारपूस केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मित्र अनिल याने त्याला हाडाखेडला ऊसतोड मजूर शोधत आलेल्या लोकांची फसवणूक करायची आहे, तू गाडी घेऊन ये, असे सांगून बोलावले.
त्याप्रमाणे गेलो असता अनिलने आणखी दोन जणांना गाडीत बसवून घेतले. लौकीमार्गे बोराडीला जाऊन एटीएम चोरीचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले. या गुन्ह्यात सहापैकी तीन संशयितांना अटक करण्यात आली. त्यातील दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली असून, एका संशयिताला आजारपणामुळे न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.