Dhule Crime News : ट्रॅक्टर चोरट्यास अटक; पिंपळनेर पोलिसांची मोठी कामगिरी

Crime News : पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस यांना गोपनीय माहिती मिळाली होती.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

पिंपळनेर : पोलिसांनी ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरीच्या टोळीतील एका संशयितास अटक केली. यावेळी पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरलेला एक ट्रॅक्टर देखील जप्त केला. मोहसीन ऊर्फ मुसा उस्मान मिर्झा (वय ३१, रा. नवापूर जि. नंदुरबार) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. (Dhule Crime Tractor thief arrested)

माध्यमिक विद्यालय, धनेर (ता. साक्री) येथील शिक्षक साहेबराव शंकर पाटील (वय ५८ वर्ष) यांच्या कांदा खळ्यातून चोरट्यांनी २४ जूनला कांदा चाळीचे गेटचे कुलूप तोडून ट्रॅक्टर, लाल रंगाची ट्रॉली असे तीन लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला होता.

याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस यांना गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी ट्रॅक्टर, ट्रॉली चोरीतील संशयित मोहसीन ऊर्फ मुसा उस्मान मिर्झा यास चोरीस गेलेले लाल रंगाचे ट्रॅक्टरसह शिताफिने ताब्यात घेतले. (latest marathi news)

Crime News
Khaparkheda Crime : पैशावरून वाद विकोपाला गेल्याने मुलाने केला वडिलांचा खून

सदर चोरास विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार नामे विकास (पुर्ण नाव माहीती नाही रा. वरकुट ता. नवापुर जि. नंदुरबार) याचे सोबत ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी केल्याची कबुली दिली. संशयिताचा साथीदार याचा पोलिस शोध घेत आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विभाग साक्री यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन कापडणीस, असई लक्ष्मण गवळी, बापू पिंपळे, वामन चौधरी, रवींद्र सूर्यवंशी, पंकज वाघ, भारत बागुल, विजयकुमार पाटील यांनी ही कारवाई केली.

Crime News
Wardha Crime : मित्राच्या पार्टीत मैत्रीण दिसताच संताप अनावर; मित्रावर केला हल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.