Dhule Crime News : गोवंश चोरणारे दोन संशयित अटकेत; कार जप्त; धुळे तालुका पोलिसांची कारवाई

Latest Crime News : संबंधित शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिसांनी तपासादरम्यान एका संशयित कारमध्ये गोमूत्र व गोमयच्या (शेण) वासरावरून दोन संशयितांना ताब्यात घेतले.
Action police team present with suspects arrested in case of cattle theft.
Action police team present with suspects arrested in case of cattle theft.esakal
Updated on

Dhule Crime News : मुकटी (ता. धुळे) येथून एका शेतकऱ्याची वासरी २१ सप्टेंबरला सायंकाळी सात ते २२ सप्टेंबरला सकाळी सहादरम्यान चोरट्यांनी नेली. संबंधित शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिसांनी तपासादरम्यान एका संशयित कारमध्ये गोमूत्र व गोमयच्या (शेण) वासरावरून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील कार जप्त केली. (Two suspected cattle thieves arrested)

अशोक देवराम पाटील (रा. मुकटी, ता. धुळे) या शेतकऱ्याची सहा हजारांची वासरी २१ सप्टेंबरला मुकटी गावशिवारातून चोरट्यांनी नेली. त्यामुळे अशोक पाटील यांनी २५ सप्टेंबरला धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता २७ सप्टेंबरला दुपारी सव्वादोनच्या सुमारास गस्तीवरील पथकास दोन जण कारमधून (एमएच ०६ एएन ८९४२) संशयितरीत्या फिरताना आढळले.

पथकाने कारजवळ पाहणी केली असता कारमधून गोमय व गोमुत्राचा वास आला. परिणामी, पथकाने चौकशी केली असता उपरोक्त घटनेतील वासरी संशयितांनी चोरल्याची कबुली दिली. तसेच वासरी विक्री केल्याचे सांगितले. कारवाईत पथकाने ८० हजारांची कार जप्त केली. (latest marathi news)

Action police team present with suspects arrested in case of cattle theft.
Nashik Crime News : पूर्ववैमनस्यातून सफाई कामगाराचा निर्घृण खून; पंडित कॉलनीत संशयितांनी केले चॉपरने वार 

तसेच संशयित शब्बीरशहा (वय २०, रा. कबीरगंज, वडजाई रोड, धुळे) व मुज्जमील मोहम्मद (वय ३४, रा. काझी प्लॉट, गल्ली क्रमांक ६, वडजाई रोड, धुळे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल महाजन, कुणाल पानपाटील, उमेश पाटील, विशाल पाटील, सोमनाथ कांबळे, योगेश पाटील, धीरज सांगळे, चेतन कंखरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Action police team present with suspects arrested in case of cattle theft.
Jalgaon Missing Cases : ग्रामीण भागात वाढले ‘सैराट’! मेहुणबारे हद्दीतून तीन वर्षांत 103 मुली, महिला बेपत्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.