Dhule Crime News : मेमू ट्रेनमध्ये संशयिताकडून 10 हजारांचा ओला भांग जप्त

Crime News : या जप्त मालासह संशयित भुजवा याला पुढील कार्यवाहीसाठी जीआरपी ठाणे चाळीसगाव प्रभारी यांच्याकडे सोपविले.
RPF officers, personnel along with the suspect carrying hemp-like material from the train.
RPF officers, personnel along with the suspect carrying hemp-like material from the train.esakal
Updated on

Dhule Crime News : येथील रेल्वेस्थानकात उभ्या मेमू ट्रेनमध्ये संशयिताकडून आरपीएफ पोलिसांनी दहा हजार रुपये किमतीचा भांगसदृश पदार्थ जप्त केला. या प्रकरणी संशयितालाही अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. (Dhule Crime Wet hemp worth ten thousand seized)

धुळे रेल्वेस्थानकात बुधवारी (ता. १७) सकाळी सात वाजून ५५ मिनिटांनी मेमू ट्रेन (०१३०४) उभी असताना ड्यूटीवर तैनात आरक्षण अंकुश गव्हाणे यांना गार्ड केबिनला लागून असलेल्या कोच नंबर CR-२३८१०५ मध्ये एक संशयित व्यक्ती त्याच्या दोन्ही हातांत दोन वजनदार बॅग घेऊन चढताना दिसला.

तो सीटवर बसल्यानंतर त्याच्या दोन्ही बॅगा तपासल्या असता त्यात ओला भांगसदृश पदार्थ आढळला. त्या वेळी स्टेशन ड्यूटीवर तैनात जीआरपी चौकी धुळेचे पोलिस शिपाई जितेंद्र पवार व उपनिरीक्षक आर. के. सिंग, सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र भामरे, हवालदार राकेश खलाने यांना याबाबत माहिती कळविले.

हे अधिकारी तत्काळ तेथे हजर झाले व त्यांनी तपासणीअंती संशयिताला आरपीएफ चौकीत उपनिरीक्षक रमेश कुमार सिंग यांच्यासमोर हजर केले. श्री. सिंग यांनी संशयिताला नाव, पत्ता विचारले असता त्याने आपले नाव हितेश राजुलाल भुजवा (वय २३, रा. अंबिकानगर, रिलायन्स टॉवरजवळ, नालंदा हॉटेलमागे, धुळे) असे सांगितले. भांगसदृश पदार्थाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. (latest marathi news)

RPF officers, personnel along with the suspect carrying hemp-like material from the train.
Dhule Bribe Crime : सरपंच पतीसह चौघे ACBच्या जाळ्यात; फागणेचा ग्रामविकास अधिकारी, लिपिक, रोजगार सेवकाचा समावेश

आरपीएफ चाळीसगावचे निरीक्षक अतुल टोके यांना माहिती मिळाल्यावर तेही आरपीएफ चौकी धुळे उपस्थित झाले. संशयिताकडून अंदाजे दहा हजार रुपये किमतीचा एकूण ३६.६२६ किलोग्रॅम भांगसदृश पदार्थ जप्त करण्यात आला.

या जप्त मालासह संशयित भुजवा याला पुढील कार्यवाहीसाठी जीआरपी ठाणे चाळीसगाव प्रभारी यांच्याकडे सोपविले. त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक टोके, उपनिरीक्षक सिंग, सहाय्यक उपनिरीक्षक भामरे, हवालदार खलाने, आरक्षक गव्हाणे, जीआरपी चौकी धुळेचे पोलिस शिपाई जितेंद्र पवार यांनी ही कारवाई केली.

RPF officers, personnel along with the suspect carrying hemp-like material from the train.
Nashik Crime News : शेतमालाची वाहतूक करणाऱ्या पीकअपवर ‘आरटीओ’ची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.