Dhule Crime News : टोळक्याच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू! पिंजारझाडी येथील घटना; 15 संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Latest Crime News : याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात १५ संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, पोलिसांनी यातील दोन संशयितांना अटक केली आहे.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

Dhule Crime News : घरकुल प्रकरणासाठी नावे मंजुरीवरून वाद घालून जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला टोळक्याने मारहाण केली. त्यांच्यातील भांडण सोडविताना एका तरुणाला गळा दाबून, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना पिंजारझाडी (ता.साक्री) येथे घडली. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात १५ संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, पोलिसांनी यातील दोन संशयितांना अटक केली आहे. (Youth dies in gang beating Incident at Pinjarzadi)

गोविंदनगर (ता. शिंदखेडा) येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रामचंद्र उत्तम साबळे यांच्या फिर्यादीनुसार ते शनिवारी (ता.२८) दुपारी पाऊणच्या सुमारास दुचाकीने (एमएच-१८/बीपी-७३७३) साक्री येथून पिंजारझाडी येथे पोहचले. तेव्हा पोलिसपाटील सुरेश दत्तू बागूल यांच्यासह काही लोकांचे टोळके आधीपासून तेथे एकत्र जमले होते. त्यावेळी त्यांनी ‘आमच्या घरकुलांची नावे मंजूर का केली नाहीत’, अशी विचारणा करीत शिवीगाळ केली.

तसेच घरकुलाविषयी राग धरून हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा सुरेश दत्तू बागूल, कलबाई दत्तू बागूल, सुनीबाई सुरेश बागूल, प्रकाश गोपीचंद अहिरे, विक्की राम बागूल व शुभम भीमराव गवळी यांनी भांडणाची सोडवासोडव करताना टोळक्याने शुभम गवळी (वय २२) याचा गळा दाबून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात शुभम बेशुद्ध पडला. त्याला साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. (latest marathi news)

Crime News
Jalgaon Crime News : जिल्‍हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

त्यावरून संशयित सुहास मंगेश गायकवाड, जितेंद्र छोटीराम बागूल, राकेश लक्ष्मण गावित, मयूर दिलीप गावित, तुषार दिलीप गावित, अशोक वामन गावित, कांतिलाल रमेश गावित, रतिलाल रवींद्र गावित, प्रकाश सुभाष गावित, प्रवीण महादू बागूल, लहू वामन गावित, नितीन संजय महाले, झुलू देवीदास गावित, कन्हय्यालाल संजय जगताप, योगेश गोरख बागूल (सर्व रा. पिंजारझाडी, ता. साक्री) यांच्याविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित राकेश लक्ष्मण गावित व योगेश गोरख बागूल यांना रात्री अटक केली.

Crime News
Jalgaon Crime News : अनाधिकृत गॅस पंप सुरूच! शिरसोलीतील छाप्यात 73 सिलिंडरसह संशयिताला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.