Dhule Crime : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यास मारहाण! युनियनचा ‘काम बंद’चा इशारा; ई- निविदा प्रक्रियेतून वाद

Crime News : राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या येथील शाखेने निषेध आंदोलनातून ठेकेदाराविरुद्ध कारवाईची मागणी मंगळवारी (ता. १६) जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे केली.
Protesters of Zilla Parishad Employees' Union protesting along with an injured employee in the beating case.
Protesters of Zilla Parishad Employees' Union protesting along with an injured employee in the beating case.esakal
Updated on

Dhule Crime : ई- निविदा प्रक्रियेत एजन्सी अपात्र ठरत असल्याने एका ठेकेदाराच्या भावाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्याला त्याच्या घरी जात मारहाण केली. तसेच त्याच्या पत्नीचा गळा दाबून सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. याप्रकरणी राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या येथील शाखेने निषेध आंदोलनातून ठेकेदाराविरुद्ध कारवाईची मागणी मंगळवारी (ता. १६) जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे केली. (Dhule Crime ZP employee beaten)

युनियनच्या निवेदनाचा आशय असा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात जोडारीपदी कार्यरत पुरुषोत्तम मंगाजी वाघ यांच्यावर हल्ला झाला. तो सावित्रीमाई सेवाभावी संस्था व सावित्रीमाई प्रा. लि. या संस्थेच्या अध्यक्षाचा भाऊ किशोर शिंदे याने १५ जुलैला रात्री दहाच्या सुमारास केला. वाघ यांच्या घरी त्यांना बेदम मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली.

शिंदे याने वाघ यांना धारदार वस्तूने जखमा केल्या. शिंदे महापालिकेत नोकरीला आहे. त्याची जिम आहे. जिममधील पहिलवानांचा धाक दाखवून वाघ परिवाराला ठार मारण्याची धमकी दिली जात आहे, असे जखमी पुरुषोत्तम वाघ यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (latest marathi news)

Protesters of Zilla Parishad Employees' Union protesting along with an injured employee in the beating case.
Nashik Crime News : अवघ्या 15 मिनिटांत दोघींच्या सोन्याच्या पोती खेचल्या; मखमलाबाद रोडवरील घटना

काम बंदचा इशारा

युनियनने सांगितले, की जिल्हा परिषद कर्मचारी वाघ यांना त्यांच्या घरी जात ठेकेदाराने मारहाण केली. वाघ कुटुंबावर भ्याड हल्ला केला. कार्यालयीन काम करताना कर्मचाऱ्यावर अशा पद्धतीने आकसापोटी हल्ला होत असेल तर तो निषेधार्ह आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा जिल्हा परिषद कर्मचारी काम बंद आंदोलन करतील, असा इशारा युनियनचे जिल्हाध्यक्ष दिनेश महाले, पी. एम. वाघ, ए. एच. गांगुर्डे, एस. ए. रणदिवे, एम. व्ही. शिंदे, एम. आर. रनाळकर, एस. एम. भामरे, जे. जे. शेख, सी. बी. गुजराथी, एन. एम. चौधरी, एस. एस. गवळी, एम. के. चव्हाण आदींनी दिला.

Protesters of Zilla Parishad Employees' Union protesting along with an injured employee in the beating case.
Dhule Crime News: बुलढाण्याच्या व्यावसायिकाची छडवेलजवळ सिनेस्टाइल लूट; निजामपूर पोलिसांत 15 जणांविरुद्ध गुन्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.