Dhule Crop Insurance Scheme: कांद्याला सर्वाधिक 70 हजारांचे विमा संरक्षण! येथे करा नोंदणी

 crop insurance scheme latest marathi news
crop insurance scheme latest marathi newssakal
Updated on

Dhule Crop Insurance Scheme : महाराष्ट्र शासनाच्या सर्वसमावेशक पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यात कांदा पिकाला प्रतिहेक्टर सर्वाधिक ७० हजारांचे संरक्षण देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ सोयाबीन व कापसाचाही समावेश आहे.

नाचणी पिकाला सर्वांत कमी अर्थात, प्रतिहेक्टर २० हजारांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. (Dhule Crop Insurance Scheme Insurance coverage of 70 thousand for onions)

राज्य शासनाने सर्वसमावेशक विमा योजना खरीप हंगाम-२०२३ राबविण्याची घोषणा केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीकविम्यासाठी www.pmfby.gov.in पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे.

या योजनेंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या पीकनिहाय प्रतिहेक्टरी विमा हप्ता व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रुपये एक मात्र वजाजाता उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजून राज्य शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक आहे. पिकाची नोंद असलेला सात-बारा उतारा, संपूर्ण भरलेले विमा प्रस्ताव अर्ज, पीक लागवड स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश, भाडेतत्त्वावरील शेती असल्यास नोंदणीकृत भाडेकरार आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

ई-पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंदणी करण्यात यावी, विमा योजनेत विमा घेतलेले व ई-पीक पाहणीत नोंदविलेले पीक यात तफावत आढळल्यास ई-पीक पाहणीत नोंदविलेले पीक अंतिम ग्राह्य धरले जाईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 crop insurance scheme latest marathi news
Nashik: अंजनेरी-ब्रह्मगिरी रोप-वे स्थलांतरणविषयी नाशिकच्या खासदारांना भेटा; संदीप भानोसेंना गडकरींची सूचना

ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही वित्तीय संस्थेकडून पिकासाठी हंगामी कर्ज घेतले आहे, अशा कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हायचे की नाही, याबाबतचे घोषणापत्र मुदतीच्या सात दिवसांआधी देणे अपेक्षित आहे.

बिगर कर्जदार शेतकरी पिकाचा विमा जवळच्या वित्तीय संस्थेमार्फत घेऊ शकतात. शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह पीकविमा प्रस्ताव अर्ज सादर करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे.

पीकनिहाय प्रतिहेक्टर विम्याची रक्कम (कंसात शेतकरी प्रीमियम) अशी

भात-४० हजार (८०० रुपये), ज्वारी-३२ हजार ५०० (६५०), बाजरी-२७ हजार ५०० (५५०), नाचणी- २० हजार (४००), भुईमूग- ३७ हजार ५०० (७५०), सोयाबीन-५० हजार (१०००), तीळ-२५ हजार (५००), मूग-२२ हजार ५०० (४५०), उडीद-२२ हजार ५०० (४५०), तूर-३६ हजार ८०२ (७३६.०४), कापूस-५० हजार (२५००), मका-३५ हजार ५९८ (७११.९६) व कांदा-७० हजार (३५००).

 crop insurance scheme latest marathi news
Nashik News: पाथर्डीतील नववसाहतींना रस्त्यांची प्रतिक्षा! पावसाळ्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.