धुळे : शहरातील पारोळा रोडवर अवैध गॅसपंपावर पोलिस उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी यांच्यासह पथकाने टाकलेल्या छाप्यात कार, दोन रिक्षांसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले.
पारोळा रोडवरील नक्षत्र रिसॉर्टमागे अवैध गॅसपंप सुरू आहे. भरवस्तीत धोकादायक पद्धतीने वीजमोटारीच्या सहाय्याने चारचाकी वाहने आणि रिक्षांमध्ये गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक रेड्डी यांना मिळाली. (Dhule Cylinder Stock seized by police Dhule Crime News)
हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
त्यानुसार मंगळवारी (ता. १३) श्री. रेड्डी यांनी पोलिस पथकाला कारवाईचा आदेश दिला. पथकाने फिरोज अकिल पिंजारी (रा. हाजी पेट्रोलपंपाजवळ, देवपूर, धुळे) वाहनामध्ये गॅस भरताना आढळल्याने त्यास ताब्यात घेतले.
तसेच एक लाखाची ओम्नी कार (एमएच १८, एस १७४६), बारा हजारांचे सात गॅस सिलिंडर, २५ हजारांची गॅस भरण्यासाठी वीजमोटर, पंधरा हजारांचे दोन इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे, २० हजारांचे पाच मोबाईल, ५० हजारांच्या दोन रिक्षा, ३० हजारांची स्कूटी असा दोन लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी, दत्तात्रय हुजे, कबीर शेख, मंगा शेमले, चंद्रकांत जोशी, रमेश उघडे, जितेंद्र आखाडे, शेखर चंद्रात्रे, भागवत पाटील, सुनील कुलकर्णी, प्रशांत पाटील, धोंडिराम गुट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.