Dhule Heavy Rain Damage: दराणे-रोहाणे येथे ढगफुटी सदृश्य पाऊस! अनेक गुरांचा बुडून मृत्यू, खलाणे मंडळात 92 मिमीची नोंद

Dhule News : आमदार जयकुमार रावल यांनी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शिंदखेडा व साक्री तहसीलदारांना दिले आहेत.
Tehsildar Dnyaneshwar Sapkale, Group Development Officer R.D. Wagh, Virendrasinh Girase, Mahendrasinh Girase, Deepak Eshi etc. while inspecting the damage caused by the flood of Patli river in Darane-Rohane.
Tehsildar Dnyaneshwar Sapkale, Group Development Officer R.D. Wagh, Virendrasinh Girase, Mahendrasinh Girase, Deepak Eshi etc. while inspecting the damage caused by the flood of Patli river in Darane-Rohane.esakal
Updated on

चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील दराणे व रोहाणे येथे रविवारी (ता.२३) रात्री दहा वाजेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पाटली नदीचे गावात पाणी शिरले. यामुळे ग्रामस्थांच्या घरातील धान्य व संसार उपयोगी वस्तू व खळ्यात बांधलेली जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेले. आमदार जयकुमार रावल यांनी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील गावांतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शिंदखेडा व साक्री तहसीलदारांना दिले आहेत. (Dhule Damage Cloudburst like rain in Darane Rohane)

सोमवारी (ता.२४) सकाळी शिंदखेडा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, शिंदखेडा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी आर. डी. वाघ, पंचायत समितीच्या सभापती छाया गिरासे, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्रसिंह गिरासे, जिल्हा परिषद सदस्य भूपेंद्रसिंह गिरासे, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गिरिधर देवरे यांनी पाहणी केली.

सोमवारी सकाळपासून पंचनाम्याचे काम चिमठाणे महसूल मंडळाचे प्रभारी अधिकारी दीपक ईशी व तलाठी सवाई- मुकटी सुनील सुरसे, तलाठी चिमठाणे प्रतीक कुलकर्णी, तलाठी तामथरे व्ही.व्ही. माळी, तलाठी उमेश पाटील आदी उशिरापर्यंत करीत होते.

सुकदेव भिवसन पाटील (रोहाणे, बैल) बजेसिंह ठाणसिंह गिरासे (दराणे, दोन वासरू), हिंमत हिलाल पाटील (सवाई-मुकटी, बैल), वसंत बाबूराव पाटील (रोहाणे, दोन म्हशीचे पारडू), राजेंद्र भटा पवार (दराणे, मीनी ट्रॅक्टर), सुदाम गिरधर पाटील (रोहाणे, पाण्याचे टँकर) वाहून गेले.

शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे नुकसान झालेले आहे त्या सर्वांचे तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार सपकाळे यांनी दिले. बैल, गाय, किराणा दुकान, मंडप, शेती उपयोगी अवजारे, बैल गाडी, ट्रॅक्टर, ट्रॉली, पाण्याचा टँकर तसेच रोहाणे-चिमठावळ हा रस्ता दोन ठिकाणी तुटला असून वाहतूक बंद झाली आहे.

यावेळी दराणे सरपंच शानाभाऊ कोळी, रोहाणे सरपंच मेघराज वाघ, माजी पंचायत समिती सदस्य राजू गिरासे, जयपाल गिरासे, प्रवीण पवार, सोनू पवार, गोपीचंद पवार, जयसिंह गिरासे, योगेश वाघ, गंजीधर धनगर, दराने ग्रामसेवक जगदीश पाटील, रोहाणे येथील ग्रामसेविका माधुरी पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते.

अनेक गावांत नुकसान तामथरे येथे सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास रवींद्र वेडू धनगर यांच्या शेतातील नदीच्या काठाला बांधून ठेवलेल्या जर्सी तीन दुभत्या गायी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. त्यांचा शोध घेतला मात्र सापडल्या नाहीत. खलाणे येथे रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी घुसून पीक व विहिरीची पडझड झाली.

वायपूर येथे रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अतिवृष्टी होऊन पांझर तलावातील पाणी शेतात घुसून शेतातील नुकत्याच पेरलेल्या पिकांचे नुकसान झाले. दसवेल येथे रविवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास पावसात शांताराम दीपा पाटील व हिरामण सखाराम कोळी यांचे राहते घर अतिवृष्टीमुळे पडल्याने नुकसान झाले. (latest marathi news)

Tehsildar Dnyaneshwar Sapkale, Group Development Officer R.D. Wagh, Virendrasinh Girase, Mahendrasinh Girase, Deepak Eshi etc. while inspecting the damage caused by the flood of Patli river in Darane-Rohane.
Pune Rain Update : पाऊस पडला, पण पाणी साठेना; पुण्यासाठी १२.२६ टक्के साठा शिल्लक

डांगुर्णे येथे रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी घुसून पिकाचे नुकसान व विहीर पडझड झाली आहे. गव्हाणे येथे सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास अतिवृष्टी झाल्याने शेतातील विहीर पडझड झाली आहे.

"शिंदखेडा तालुक्यातील दराणे, रोहाणे, बेटावदसह विविध ठिकाणी रविवारी रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू व शेतीचेही नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची कार्यवाही करावी."

- जयकुमार रावल, आमदार शिंदखेडा.

शिंदखेडयात महसूल मंडळ निहाय पाऊस

शिंदखेडा मंडळ २८ (एकूण ११४ मिलिमीटर)

नरडाणा ६४ (१४४)

खलाणे ९२ (१४१)

चिमठाणे ४५ (१३८)

वर्शी १० (८७)

बेटावद ५५ (१२०)

विरदेल ०३ (१८)

दोंडाईचा ०८ (४३)

विखरण ०६ (१००)

शेवाडे १५ (९५)

--------------------------------------

एकूण ३२६ (१०००)

Tehsildar Dnyaneshwar Sapkale, Group Development Officer R.D. Wagh, Virendrasinh Girase, Mahendrasinh Girase, Deepak Eshi etc. while inspecting the damage caused by the flood of Patli river in Darane-Rohane.
Nanded Rain : नांदेडसह काही तालुक्यांत पावसाची हजेरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.