Dhule News : शहरातील प्रभाग अकरामधील पवन नगरात लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे रहिवाशांचा जीव धोक्यात येत आहे. त्यामुळे अशा तारा बदलण्यासह या नगरात स्वतंत्र डिपी बसवावी, प्रभागातील इतर समस्या सोडवाव्यात, अशी मागणी माजी नगरसेविका तथा माजी बालकल्याण समिती सभापती वंदन थोरात व रहिवाशांनी केली. वीज ताराप्रश्नी महावितरण कंपनीच्या पारोळा रोड विभागाचे सहायक अभियंता अविनाश कापडणीस यांना सौ. थोरात व रहिवाशांनी मागण्यांचे निवेदन दिले. (Danger of hanging power lines problem in Ward Eleven )
त्यानुसार मनपा प्रभाग अकरामध्ये पवन नगर येथे वीज कंपनीच्या पोलवरील तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे या भागातील लहान मुले, महिलांसह रहिवाशी भितीखाली वावरतात. लोंबकळणाऱ्या वीज तारा तत्काळ बदलाव्यात. नाटेश्वर सोसायटीतील हीच समस्या सोडवावी. शिव कॉलनी परिसरात शिव मंदिराच्या बाजूला वीज तारांबाबत अडचण असून या तीन भागातील तार हटवावी व केबल वायर बसवावी. रामचंद्र नगर व पवन नगर येथे एकच डीपी आहे. परंतु, जास्त अधिभारामुळे डीपी वारंवार नादुरूस्त होत असते. (latest marathi news)
त्याचा रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून पवन नगर भागासाठी एक स्वतंत्र डीपी द्यावी. रहिवाशांच्या जीवनाशी निगडीत या समस्या लवकर सोडवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे सौ. थोरात, संदीप सरग, राकेश खेमनार, अक्षय बंब, विश्वनाथ बोरसे, पंकज चौधरी, दीपक चौधरी, अनिल पाटील, भूषण पाटील, नैतिक चौधरी, धिरज चौधरी, रोशन भोई, निर्मला चौधरी, भगवान मिस्तरी, जयश्री मराठे, डॉ. जितेंद्र पाटकर आदींसह राम नगर, हमाल मापाडी प्लॉट, नवनाथ नगर, रामचंद्र नगर, पवन नगरातील रहिवाशी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.