Dhule MSRTC News : खिळखिळ्या ‘एसटी’तून जीवघेणा प्रवास! साक्री आगारातील आजारी बस धावताहेत रस्त्यावर

Dhule News : प्रवाशांचा धोकादायक प्रवास सध्या सुरू असून, या गंभीर विषयाकडे प्रशासनाने लक्ष घालून प्रवाशांची सुरक्षितता जपण्याची गरज निर्माण झाली आहे.
Emergency route constructed with broken glass & ropes of a bus in the depot
Emergency route constructed with broken glass & ropes of a bus in the depotesakal
Updated on

साक्री : हजारो प्रवाशांचे हक्काचे वाहन असणारे आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद घेऊन खरोखरच प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, अनेक नादुरुस्त, खिळखिळ्या बस रस्त्यावरून धावत आहेत. यातून प्रवाशांचा धोकादायक प्रवास सध्या सुरू असून, या गंभीर विषयाकडे प्रशासनाने लक्ष घालून प्रवाशांची सुरक्षितता जपण्याची गरज निर्माण झाली आहे. (Dhule Dangerous journey through nailed MSRTC Bus)

साक्री आगारात सध्या ९१ बस उपलब्ध असून, यातील ६० टक्क्यांहून अधिक बस दहा वर्षांहून अधिक कालावधीपासून धावत आहेत. नवीन बसची सातत्याने मागणी असताना साक्री आगाराला मात्र बस मिळू शकलेल्या नाहीत. उपलब्ध बसची सध्या दुरवस्था झाल्याचे दिसून येत असून, अनेक बसच्या खिडकीच्या काचा तुटल्या आहेत.

काहींचे पत्रे निघाले आहेत, तर या बसमध्ये अपघातावेळी बाहेर पडण्यासाठी असणारा ‘संकटकालीन मार्ग’ हादेखील दुरवस्थेमुळे संकटात आला आहे. तो दोरीच्या सहाय्याने बांधून ठेवण्यात आलेला दिसून येतो. बसच्या आतील सीटचीदेखील दुरवस्था झालेली दिसून येते.

या नादुरुस्त बसमधून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. यातून अपघातांचे प्रमाणदेखील वाढले असून, गेल्या पंधरा दिवसांत साक्री आगारातील सात बसला अपघात झाले आहेत. एकीकडे बसची दुरवस्था असताना त्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसत असल्याने सर्वच प्रवाशांचा जीव यामुळे धोक्यात येत आहे.

ट्रॅफिक पोलिस तसेच परिवहन विभागाकडून दुचाकीचालकांवर तीन जणांना बसविले, तर कारवाई केली जाते, मात्र अनेक बसमधून क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी जीवघेणा प्रवास करत असताना यावर कोण कारवाई करणार, हादेखील प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो आहे. (latest marathi news)

Emergency route constructed with broken glass & ropes of a bus in the depot
Dhule News : आदेशपत्राअभावी महापालिकेचे उत्पन्न थांबले! आमदारांच्या दाव्यानंतर शासकीय लेखी भूमिकेची प्रतीक्षा

पंढरपूर यात्रेसाठी अतिरिक्त बस

दरम्यान, साक्री आगारात दैनंदिन प्रवासासाठी अधिकच्या बसची गरज असताना आता उपलब्ध बसमधून पंढरपूर यात्रेसाठी ३५ बसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच एकाच वेळी ४४ प्रवासीसंख्या उपलब्ध झाल्यास स्वतंत्र बसदेखील दिली जाणार असल्याचे आगार प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

योजना वाढल्या, उत्पन्न घटले

एसटी महामंडळातर्फे विद्यार्थी, दैनंदिन प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आदी प्रवाशांना विविध सवलती आजवर देण्यात येत होत्या. यात आता ७५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत, तर महिलांना ५० टक्के तिकीट दरात सवलत दिल्याने प्रवासीसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. यामुळे अनेक मार्गांवर बसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. प्रवासीसंख्या वाढली असली तरी मात्र या सवलतींमुळे दैनंदिन उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येते. पूर्वी साक्री आगारात दररोज १३ ते १४ लाखांचे उत्पन्न मिळत होते, ते सध्या आठ ते नऊ लाखांवर आले आहे.

"एसटी बसची नियमित देखभाल व दुरुस्ती केली जात असून, त्याकडे आणखीन गांभीर्याने लक्ष दिले जाईल. तसेच नवीन बस उपलब्ध करण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत. अपघात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून चालकांचे समुपदेशनदेखील करण्यात येत असून, अनेक वेळा रस्त्याची दुरवस्था किंवा समोरील वाहनचालकाच्या चुकांमुळेदेखील अपघाताच्या घटना घडल्या आहेत."

- सुनील महाले, आगारप्रमुख, साक्री

Emergency route constructed with broken glass & ropes of a bus in the depot
Dhule News : शिंदखेड्यात विखरण महसूल मंडळात अतिवृष्टी; खलाणे, चिलाणे येथे मातीच्या घरांची पडझड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.