Dhule News : लोणखेडीत झोपडीतील चिमुरड्यांचा होरपळून मृत्यू

Dhule : धुळे तालुक्यातील लोणखेडीपासून दोन किलोमीटरवर दुपारी चारच्या सुमारास पवार कुटुंबीयांची झोपडी जळाली.
A hut burnt down by the burning embers of the stove.
A hut burnt down by the burning embers of the stove.esakal
Updated on

Dhule News : धुळे तालुक्यातील लोणखेडीपासून दोन किलोमीटरवर दुपारी चारच्या सुमारास पवार कुटुंबीयांची झोपडी जळाली. यात दोन चिमुकल्यांचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली. झोपडीत चिमुकले अमोल नाना पवार (वय ७), रीना नाना पवार (वय ४) अशी दोन चिमुकली होती. अमोल व रीना यांचे आई-वडील आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल त्या पैशातून आपला प्रपंच कसा चालेल यासाठी ऊसतोडणीसाठी बारामतीला वास्तव्यास होते. ()

आपल्या लेकरांचे शैक्षणिक व शारीरिक नुकसान होऊ नये यासाठी लोणखेडीकडे असणाऱ्या आजी-आजोबांकडे त्यांना सोडून गेले. माळमाथ्यावरील जंगल क्षेत्रात तेलीबारी भागात गट क्रमांक २३३ या ठिकाणी एकांत टेकडीवर आजोबा शंकर दावलसे, आजी सताबाई दावलसेंसमवेत नातवंडे वास्तव्यास होती.

आजोबा बाहेरगावी गेल्यामुळे आजी आणि नातवंडे झोपडीत होती. यावेळी आजी जनावरांना चारापाणी आणण्यासाठी टेकडीवरून खाली उतरली. लेकरे झोपडीत खेळत होती. आजी झोपडीची ताटी बंद करत म्हणाली,

‘घरमाच रव्हा रं... मी घडीभरमा उणी..’ आजीचे हेच शब्द अखेरचे ठरले.

आपल्या कामासाठी मार्गस्थ झाली; परंतु झोपडीतील चुलीच्या धगधगत्या निखाऱ्याने उडून झोपडीवर अंथरलेल्या सुक्या गवताने पेट घेतला. प्रखर ऊन-वाऱ्याच्या झुळकेने झोपडी भरभर पेटू लागली. झोपडीतील अमोल व रीना आकांत करत होते. आपला प्राण वाचविण्यासाठी त्यांनी आत असलेल्या खाटेखाली जाण्याचा प्रयत्न केला; परंतु नशिबाची शिदोरीच कमी असल्यामुळे अमोल, रीना यांचा होरपळून मृत्यू झाला.

A hut burnt down by the burning embers of the stove.
Dhule News : धुळ्यात 5 दिवस महासंस्कृती महोत्सव : 26 फेब्रुवारीला उद्‍घाटन

घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांनी धाव घेतली. अथांग दुःख डोळ्यासमोर आल्याने आई-वडिलांना तत्काळ घटनेची माहिती दिली. शनिवारी रात्रीच आई-वडील दाखल झाले. दोन्ही लेकरांवर बागलाण तालुक्यातील गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

झोपडीत संसारोपयोगी वस्तूंचा कोळसा झाल्याने आदिवासी पवार कुटुंबीयांना मदतीचा हात मिळावा यासाठी धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी संसारोपयोगी वस्तू तेल, साखर, अन्नधान्य, भांडी, पांघरूण आदी वस्तू देऊन मदतीचा हात दिला. उपअधीक्षक साजन सोनवणे, पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील आदी पोलिस दलातील कर्मचारी, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

''१७ फेब्रुवारीला लोणखेडी गावात अत्यंत दुर्दैवी घटना झाली. दोन लहान लेकरांचा होरपळून मृत्यू झाला. आई, वडील रोजगारासाठी बाहेरगावी वास्तव्यास आहेत. त्यांचे जगणे सुकर व्हावे या भावनेतून पवार कुटुंबीयांना दैनंदिन गरजेच्या वस्तू पोलिस विभागाकडून सुपूर्द करीत आहोत.''-श्रीकांत धिवरे, जिल्हा पोलिस अधीक्षक (latest marathi news)

A hut burnt down by the burning embers of the stove.
Dhule News : डायल 112 ला प्रतिसाद न देणाऱ्यांचे वाजविले बारा; 4 पोलिस निरीक्षक ‘कंट्रोल’ला ‘ॲटॅच’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.