म्हसदी : धुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून तेलबियांच्या लागवड क्षेत्रात कमालीची घट होत असल्याचे चित्र आहे. पीक निघेपर्यंत घेतलेल्या मेहनतीचा अपेक्षित परतावा हाती लागत नसल्याने नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दिवसेंदिवस तेलबियांची पेरणी कमी होत असल्याने खाद्य तेलाचे दरही गगनाला भिडले आहेत.
पूर्वी मुबलक मिळणारी पौष्टिक ‘तीळ’ शोधूनही मिळत नाही. तथापि, नगदी पिकांकडे वाढलेला कल, नाविन्यपूर्ण बियाण्यांच्या संशोधनाचा अभाव, अत्यल्प उत्पन्न व इतर तत्सम कारणांमुळे शेतकऱ्यांचा तेलबिया पिकाकडे कानाडोळा होत असल्याचे मान्य करावे लागेल. (Decline in cultivation of oilseeds in district)