Dhule Rice Crop : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील भाताचा सातासमुद्रापार दरवळ! पिकविला जातो सुगंधी अन दर्जेदार गावरान तांदूळ

Dhule News : या भागात तांदळाचे अनेक वाण असून, ते भात, खिचडी, पुलाव, तूप-भात, डाळभात, गूळभात, साखरभात असे वेगवेगळे प्रकार करून आपण खाऊ शकतो.
During cultivation of the field for cultivation of transplanted rice in the area.
During cultivation of the field for cultivation of transplanted rice in the area.esakal
Updated on

वार्सा : पिंपळनेरच्या पश्‍चिम पट्ट्यात उत्तम प्रकारे भात शेती केली जाते. ज्या प्रकारे कोकणात करतात तशीच या भागातही आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने भातशेती करतात. भातशेतीसाठी पश्चिम पट्ट्यातील भौगोलिक वातावरण अनुकूल आहे हे महत्त्वाचे कारण आहे. परिसरात भात रोपणीसाठी योग्य पाऊस पडतो.

पश्चिम पट्टा हा गावरान तांदळाचे माहेरघर आहे. या भागातील गावरान सुवासिक तांदळाने सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. या भागात तांदळाचे अनेक वाण असून, ते भात, खिचडी, पुलाव, तूप-भात, डाळभात, गूळभात, साखरभात असे वेगवेगळे प्रकार करून आपण खाऊ शकतो. (Dhule demand of rice of western belt of Pimpalner in abroad )

रोपणी व पेरणी लागवडीचे प्रकार

रोपणी भातासाठी अगोदर जमिनीवर छोटे-छोटे वाफे करून त्यात काडी कचरा गोळा करून जमिनीची भाजणी करून त्या ठिकाणी भाताची रोपे टाकली जातात. ती रोपे मोठी झाल्यावर जमीन तयार करतात. प्रथम भात ज्या ठिकाणी लावायचा त्या जागेला चहुबाजूने मातीचा उंच बांध बांधून घ्यावा लागतो.

त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यानंतर चिखलणी करावी. ज्या ठिकाणी भात रोपणी करायची त्या ठिकाणी एक फुटापर्यंत पाणी असावे मग रोपणी करावी लागते. पेरणी भातासाठी शेतीची उन्हाळ्यात नांगरणी करून पावसाळ्यात पाऊस पडल्यावर तिफण पेरणी करावी लागते.

पिंपळनेर, वार्सा, दहिवेल येथे भरणाऱ्या आठवडेबाजारात पश्चिम पट्ट्यातील चांगल्या प्रतीचा गावरान तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध असतो. तांदळाचा सगळ्यात मोठा बाजार पिंपळनेर येथे शुक्रवारी भरतो. बाजारातील गांधी चौकात तांदूळ विकला जातो.

हातसडीच्या तांदळाला मागणी

पिंपळनेर येथे हातसडीचा तांदूळ मोठ्या प्रमाणात तयार करून तो विकला जातो. हातसडीचा भात मधुमेहीदेखील खाऊ शकतात. त्यात प्रथिने (प्रोटिन्स) जास्त असतात म्हणून लहान बालकांना खाण्यासाठीदेखील उपयुक्त असतो.

भाताचे वाण

इंद्रायणी, सुकवेल, चिमणसाळ, बासमती, सुरुची, एककाड्या, खुशबू, रूपाली यांची लागवड होते, तर दोडक्या, भोवाड्या, डावाड्या, खुशबू यांसह अनेक नवीन वाणांची लागवड व पेरणी करूनदेखील भात पिकविला जातो. अनेक विविध जातीचे भाताचे वाण बाजारात उपलब्ध आहेत.

त्यांची लागवड केली जाते. भात पिकासाठी पाणी जास्त प्रमाणात लागते. ज्या भागात जास्त पाऊस त्या भागात भातशेती केली जाते. पिंपळनेरच्या पश्‍चिम पट्ट्यात चारसूत्री, एसआरटी (सगुणा राईस पद्धत), स्त्री पद्धत, तसेच पारंपरिक पद्धतीने चिखलणी करून व फळी फिरवून भात लागवड केली जाते. (latest marathi news)

During cultivation of the field for cultivation of transplanted rice in the area.
Nashik Monsoon Update : मंगळवारी शून्‍य मिलिमीटर पावसाची नोंद! पावसाची दडी, आद्रतेने उकाडा

इंद्रायणी भात

पश्चिम पट्ट्यात ६० टक्के शेती ही भाताची आहे. यात आंबेमोहोर, बासमती, इंद्रायणी, सुकवेल, जळगावपास, भवाड्या, खुशबू, चिमणसाळ व दोडक्या या जातीचे पीक अधिक आहे. यात सुकवेल भाताचे उत्पन्न एकरी कमी व खर्चिक आहे. पण भाव जास्त मिळतो, तर इंद्रायणीचे उत्पन्न भरपूर व विक्री दर ही समाधानकारक असतो. म्हणून पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील सगळ्यात जास्त पिकविला व विकला जाणारा तांदूळ म्हणजे इंद्रायणी.

सुकवेल जुना वाण

सुकवेल तांदूळ म्हणजे जुना वाण. हा सगळ्यात सुगंधी व उत्पादनक्षमता कमी परंतु सगळ्यात जास्त भाव खाणारा तांदूळ महागडा तांदूळ म्हणून याची बाजारपेठेत दादागिरी २८० ते ३०० रुपये चंप्याने विक्री केली जाते. सुकवेल तांदूळ २८० ते ३०० रुपये चंप्याने विकूनसुद्धा परवडत नसल्याचे बंधरपाडा येथील शेतकरी राजाराम कुवर यांनी सांगितले.

भाताच्या जुन्या जाती कालबाह्य

दोडक्या, लालसर भवाड्या, डावाड्या, कोलम, चिमणसाळ, एककाड्या हा भात क्वचित प्रमाणात मिळतो. याचे उत्पादन कमी येत असल्याने जास्त प्रमाणात कुणी लागवड करत नाही. या भाताचा वाण आता जिरा राइस, सोनम या नावाने उपलब्ध आहे.

जास्त पाण्याची गरज

भात लावायचा म्हणजे जास्त पाण्याची गरज भासते. ज्या ठिकाणी भातलागवड करायची त्या ठिकाणी पाणी साचविले जाते. त्या शेतीची पाण्यात नांगरणी करून पाटी फिरविली जाते. नंतर एक फुटाएवढ्या पाण्यात भाताची रोपे लावली जातात. भाताची रोपे कमीत कमी २१ दिवसांची किंवा एक फूट उंच असावी, तेव्हा लागवड करतात.

During cultivation of the field for cultivation of transplanted rice in the area.
Dhule Agriculture News : तृणधान्यात मका पेरणी सर्वाधिक! साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचा हमखास उत्पन्नामुळे कल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com