Dhule Dhandai Devi : नैसर्गिक सौंदर्याने नटलाय धनदाईदेवीचा माळ; म्हसदी येथे धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे योगदान

Dhule Dhandaidevi : शासनाच्या शतकोटी वृक्षलागवड मोहिमेत येथील श्री क्षेत्र धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचा नेहमीच सहभाग असतो.
Dhandai Devi Tarun Aikya Mandal on Dhandai Devi's Mal mountain. In the second photo, a pipeline facility built on a hill for drip.
Dhandai Devi Tarun Aikya Mandal on Dhandai Devi's Mal mountain. In the second photo, a pipeline facility built on a hill for drip.esakal
Updated on

Dhule Dhandai Devi : शासनाच्या शतकोटी वृक्षलागवड मोहिमेत येथील श्री क्षेत्र धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचा नेहमीच सहभाग असतो. गेल्या अनेक वर्षांपासून धनदाईदेवीच्या मंदिरालगत मंडळाच्या स्वमालकीच्या जागेवर हजारो झाडे लावत नैसर्गिक सौंदर्यात भर घातली आहे. विशेष म्हणजे दहा वर्षांपूर्वी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या धनदाईदेवीचा माळ डोंगरावर मंडळाने सुमारे दोन हजार विविध प्रकारची रोपे लावली होती. ( Dhandai Devi Temple is full of natural beauty)

रोपांचे आज वृक्षात रूपांतर झाले असून, ही वनराई नैसर्गिक सौंदर्य खुलवत आहे. धनदाईदेवीच्या मंदिरापासून सुमारे साडेतीनशे फूट उंचीवर ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊन शंभर टक्के झाडे जगवून वृक्षसंवर्धनाचे कौतुकास्पद काम केले आहे. अन्य ठिकाणी वन विभागाने असाच प्रयोग राबविला, तर वनक्षेत्र हमखास हिरवेगार दिसेल. येथील धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाने भाविकांच्या सोयीसाठी विविध विकासाबरोबर पर्यावरण संतुलनासाठी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

मंडळातील सर्व १७ पदाधिकारी, कर्मचारी व सेवेकऱ्यांनी वृक्षसंवर्धनासाठी झोकून दिले आहे. शासनाने तरुण ऐक्य मंडळास छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, उपाध्यक्ष काशीनाथ देवरे, खजिनदार उत्तमराव देवरे, सचिव महेंद्र देवरे व संचालक मंडळाने दिली.

विविध वृक्षांनी बहरली वनराई

धनदाईदेवीचा माळ डोंगरावर पताडी, काशीद, खैर, शिसव, गिलीसीडी, रेएन्ट्री, गुलमोहर, सत्तपर्णी, वड, पिंपळ, लिंब, बाभूळ यांसारखी झाडे लावली आहेत. आज दहा वर्षांनंतर ही झाडे चांगलीच बहरली आहेत. मंदिराच्या मागचा डोंगराचा भाग हिरवागार दिसत आहे. पिंप्रामाळ, धनदाईदेवीचा माळ, देवधर, दोमदेर, अक्कलदर आदी भागातही वृक्षसंवर्धन झाले तर एक चांगले काम उभे राहू शकते. (latest marathi news)

Dhandai Devi Tarun Aikya Mandal on Dhandai Devi's Mal mountain. In the second photo, a pipeline facility built on a hill for drip.
Dhandai Devi Yatrototsav : आदिमाया धनदाईदेवी मातेचा उद्यापासून यात्रोत्सव

सामाजिक कामातही सहभाग

धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाने देवीजवळ दर्शनासह नवसपूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांना मोफत निवास, पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधा देण्याचा प्रयत्न कायम सुरू ठेवला आहे. शिवाय गावातील जुनी, जीर्ण झालेल्या मंदिराची दुरुस्तीही केली आहे. आदिमाया, कुलस्वामिनी धनदाईदेवीच्या दर्शनासाठी राज्यासह गुजरात, मध्य प्रदेशातील भाविक हजेरी लावतात. वर्षभरात लाखो भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होतात. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून तरुण ऐक्य मंडळ तत्पर सेवा देत आहे.

''झाडे लावा, झाडे जगवा यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच अनेक सामाजिक संस्थाही पुढे येत आहेत. तथापि, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ अनेक वर्षांपासून वृक्षसंवर्धनासाठी सातत्याने योगदान देत आहे.''-सुभाष देवरे, अध्यक्ष, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ, म्हसदी

''धनदाईदेवीचा माळ डोंगरावर धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाने दहा वर्षांपूर्वी सुमारे दोन हजार विविध प्रकारची रोपांची लागवड करत जतन केली आहेत. आज त्यांचे वृक्षात रूपांतर होऊन वनराई उभी राहिली आहे. वन‌ विभागाने असे उपक्रम राबविले तर उघडेबोडके डोंगर हिरवेगार होतील.''-महेंद्र देवरे, सचिव, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ, म्हसदी

Dhandai Devi Tarun Aikya Mandal on Dhandai Devi's Mal mountain. In the second photo, a pipeline facility built on a hill for drip.
Dhule Dhandaimata : नवसाला पावणारी स्वयंभू धनदाईमाता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.