Dhule Digital Crop Survey : पिकांच्या नोंदीसाठी केंद्राकडून ‘डिजिटल पीक सर्वेक्षण’ करण्यात येणार आहे. ही प्रणाली आता धुळे जिल्ह्यातही राबविली जाणार आहे. राज्यात सध्या वापरत असलेल्या ई-पीक पाहणी मोबाईल उपयोजनमध्ये ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ मोबाईल उपयोजन सामायिक केले आहे. आता १५ एप्रिलपासून उन्हाळी हंगामात डिजिटल क्रॉप सर्व्हेचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्याची निवड झाली आहे. (Dhule Digital Crop Survey for Farmers )
उन्हाळी हंगामात ‘डिजिटल क्रॉप सर्वेक्षण’ हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यास सुरवात झाली. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एक तालुका अशा एकूण ३४ तालुक्यांमधील तीन हजारांवर गावांची निवड केली आहे. आतापर्यंत राज्यात ई-पीक पाहणी या मोबाईल उपयोजनमध्ये (अॅप) पीक, त्यांचे क्षेत्र नोंदविण्यात येत होते.
पीक पाहणीच्या पारंपरिक पद्धतीत बदल करून शेतातील पिकांची नोंद ई-पीक पाहणी मोबाईल उपयोजनद्वारे शेतकऱ्यांनी करण्यासाठी राज्य शासनाचा ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून सर्वत्र राबविण्यात येत आहे. या उपयोजनेत आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्याने केंद्राच्या कृषी मंत्रालयाने खरीप हंगाम २०२३ पासून डिजिटल क्रॉप सर्व्हेचा (डीसीएस) पथदर्शी प्रकल्प राबविला. (latest marathi news)
गरजेची माहिती भरावी
केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये अनुदान, पीकविमा, नुकसानभरपाई आदींचा समावेश आहे. मात्र, अनेक पिकांची नोंद करण्यासाठी अद्ययावत सुविधा नाही. त्यामुळे शासनाकडून अनुदान, विमा किंवा नुकसानभरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यास विलंब होत असतो. यासाठी डिजिटल स्वरूपात केंद्राला अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यासाठी हा प्रकल्प सुरू झाला आहे.
पीक पाहणीच्या नोंदी या पीकविमा, पीकविमा दावे निकाली काढणे, पीककर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई, उपयोजन डाउनलोड केल्यानंतर नोंदणी महत्त्वाची आहे. गाव आणि गट क्रमांक, पिकांचे छायाचित्र आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागते. यासंबंधी गुगल प्ले-स्टोअरवर १५ एप्रिलपासून उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.