Dhule News : दोंडाईचा अपर तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य; विविध मूलभूत सुविधांचा अभाव

Dhule News : दोंडाईचा अपर तहसील कार्यालयात विविध सुविधांचा अभाव असून, घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. अपर तहसील कार्यालयाच्या मैदानात कधीच साफसफाई होत नाही.
The state of disrepair of the upper tehsil office toilet.
The state of disrepair of the upper tehsil office toilet.esakal
Updated on

Dhule News : दोंडाईचा अपर तहसील कार्यालयात विविध सुविधांचा अभाव असून, घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. अपर तहसील कार्यालयाच्या मैदानात कधीच साफसफाई होत नाही. कार्यालयाच्या मागील बाजूस अजूनपर्यंत साफसफाई झाली नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नारिकांनी केली आहे. या कार्यालयात ४७ गावांचा समावेश असून, तेथे नागरिक आपल्या विविध कामांसाठी येतात. (Dirt empire in upper tehsil office)

येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. अपर तहसीलदारांसह सर्व अधिकारी व कर्मचारी पाण्याच्या बाटल्या घेऊन येतात. मात्र सर्वसामान्य जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना खर्च करून पाण्याची बाटली घ्यावी लागते व परिस्थिती नसल्यास सर्वसामान्य नागरिकाला पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागते म्हणून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

प्रसाधनगृहाअभावी नाराजी

अपर तहसील कार्यालयात नेहमी गर्दीचे स्वरूप असते. सध्या कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र प्रसाधनगृह नसल्याने कार्यालयात नैसर्गिक विधीसाठी जागा नसल्याने अनेकांची पंचाईत होते. (latest marathi news)

The state of disrepair of the upper tehsil office toilet.
Dhule News : पिंपळनेरकरांचा संताप; पाण्याच्या निचऱ्यासाठी गटारी, पण सुरक्षाफलकच नाहीत

कार्यालयाच्या मागील बाजूस काही जण उघड्यावर लघुशंका करत असल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले, तर नागरिकांना यासाठी लांब जावे लागत आहे. कार्यालयात तत्काळ व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

शौचालयाची अवस्था गंभीर

कार्यालयात जुने शौचालय असून, त्याची स्थिती वाईट आहे. त्याची कधीही साफसफाई केली गेली नाही. ते वापरत नसल्याने तेथे घाणीचे साम्राज्य आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याची दुरुस्ती करत त्याचा वापर सुरू करावा म्हणजे कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होणार नाही म्हणून तत्काळ दुरुस्ती व्हावी, अशी मागणी होत आहे.

The state of disrepair of the upper tehsil office toilet.
Dhule News : पोलिस, नागरिकांच्या दक्षतेने बाळाला मायेची ऊब! शिरपूरमध्ये मद्यधुंद महिलेकडे तळोजाच्या दांपत्यांचे बाळ आले कुठून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.