Dhule News : अल्पवयीन मुलीसह तरूणी गायब; साळवेत एकाच रात्रीची घटना

Dhule : साळवे (ता. शिंदखेडा) येथील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले. तर एक तरूणी कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेल्याचा प्रकार मंगळवारी (ता. ८) रात्री एकच्या सुमारास घडला.
missing
missingesakal
Updated on

चिमठाणे : साळवे (ता. शिंदखेडा) येथील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले. तर एक तरूणी कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेल्याचा प्रकार मंगळवारी (ता. ८) रात्री एकच्या सुमारास घडला. मुलींचे अपहरण तर झाले नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पालकांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात पालकांनी तक्रार दाखल केली आहे. साळवे येथील कुटूंब पती-पत्नीसह दोन मुले व १४ वर्षाच्या मुलीसह राहतात. (disappearance of young woman along with minor girl is single night incident )

मोलमजुरी करुन परिवाराचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी (ता.७) रात्री नऊच्या सुमारास कुटुंब झोपलेले असताना मंगळवारी (ता. ८) सकाळी मुलगी जागेवर दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही. त्यामुळे पालकांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दुसऱ्या घटनेत पुलज्वारी, ता. अचाली, जि बडवाणी, मध्यप्रदेश ह. मु. साळवे (ता. शिंदखेडा) येथे १९ वर्षीय तरुणी भावासह राहत होती.

सुभाष लोटन पाटील यांच्या शेतात सहा महिन्यांपासून मोलमजुरी करीत होते. मंगळवारी सकाळी सदर तरुणी बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी तिच्या भावाने शिंदखेडा पोलिसात तक्रार दाखल केली. या दोन्ही प्रकरणांचा तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गुलाब ठाकरे करीत आहेत.

missing
Dhule Crime News : अतिक्रमित वनजमिनीच्या वादातून गोळीबार; रामपुरा फाटा परिसरात तीन जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.