धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने मोठी कारवाई केली असून, २८१६ किलो गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत अंदाजे ५.६३ कोटी रुपयांच्या घरात असल्याचे समजते. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.