Dhule News : भय आणि कॉपीमुक्ततेसाठी बारावी आणि दहावीच्या परीक्षेंतर्गत पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शिक्षण विभागांना दिला. या निर्णयामुळे शिक्षकांची गैरसोय होईल, असे गाऱ्हाणे मांडण्यासाठी शिक्षक संघटना खासदार डॉ. सुभाष भामरे यांना सोबत घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे पोचल्या.
त्यांना हा निर्णय बदलण्यासाठी गळ घातली. मात्र, जिल्हाधिकारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. (dhule District Collector Abhinav Goyal ordered education department to exchange invigilator under 12th and 10th examination news)
प्रथम बारावीची, नंतर दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. ही परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त होण्यासाठी शासन पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. याअनुषंगाने जिल्हाधिकारी गोयल यांनी पर्यवेक्षकांच्या अदलाबदलीचा निर्णय घेतला आहे.
यात उदाहरणादाखल घेतले तर धुळे शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूल परीक्षा केंद्राला तीन शाळा जोडलेल्या असतील, तर या परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षक शिक्षकांना शहरातील जवळच्या शाळेत पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती दिली जाईल. शहरासह ग्रामीण भागात या प्रकारे पर्यवेक्षकांची अदलाबदल केली जाईल.
सहमतीची भूमिका
या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांनी दहावी, बारावी बोर्डाच्या नियुक्त पर्यवेक्षकांचे परीक्षा केंद्र न बदलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी (ता. १४) निवेदनाद्वारे केली. या संदर्भात जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक व शिक्षक, शिक्षकेतर संघटनेने म्हटले आहे, की बारावी आणि दहावीची परीक्षा भयमुक्त, कॉपीमुक्त झाली पाहिजे.
गैरप्रकार न होता ती सुरळीत झाली पाहिजे. या निर्णयाशी शिक्षक संघटना सहमत आहेतड परंतु या परीक्षांवेळी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा नियमित सुरू असतात. या कालावधीत संबंधित शिक्षक/पर्यवेक्षकांना स्वतःच्या शाळांचे अध्यापन सांभाळून संलग्न केंद्रावर परीक्षाकामी उपस्थित राहावे लागते.
संघटनांची मागणी
संबंधित शिक्षकांचे केंद्र बदलले आणि शाळा व केंद्रात अधिक अंतर असले तर त्यांना शाळा बंद ठेवावी लागेल. शाळेचे काम न करता प्रवास करून संबंधित केंद्रावर जावे लागेल. शहर परिसरासह ग्रामीण भागात ही मोठी समस्या उद्भवेल.
तसेच उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज स्वतःच्या शाळेतच पर्यवेक्षकीय यंत्रणेसमोर करणे बंधनकारक आहे. शिक्षकांना संलग्न केंद्र बदलून पर्यवेक्षकाचे काम दिले तर संबंधित शिक्षक हे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामकाजासाठी असलेले परीक्षक आणि नियामकांचे कामकाज वेळेवर पूर्ण करू शकणार नाहीत.
त्यामुळे निकालास विलंब होईल. त्यामुळे संलग्न केंद्र बदल न करता पर्यवेक्षकांना संलग्न केंद्रावरच पर्यवेक्षक म्हणून कामकाज द्यावे, अशी मागणी संघटनांचे पदाधिकारी आर. व्ही. पाटील, महेश मुळे, भागवत पाटील, एम. बी. मोरे, पंकज पाटील, राहुल पाटील, दिलीप पाटील, भरत काळे, अविनाश भदाणे, एस. डी. चौधरी, एम. डी. पाटील, प्रदीप भदाणे, आर. आर. मानकर यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.