Dhule News : रावेरचे लोकनियुक्त सरपंच अपात्र; अतिक्रमण भोवले

Dhule : शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी रावेर (ता. धुळे)च्या लोकनियुक्त सरपंच दीपाली साहेबराव पाटील (देवरे) यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले.
District Collector, Abhinav Goel
District Collector, Abhinav Goelesakal
Updated on

Dhule News : शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी रावेर (ता. धुळे)च्या लोकनियुक्त सरपंच दीपाली साहेबराव पाटील (देवरे) यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले. २०२३ च्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत श्रीमती पाटील लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या.

सरपंच दीपाली पाटील (देवरे) यांनी सरकारी जागेवर जास्तीचे बांधकाम करून अतिक्रमण केले होते. (Dhule district collector declared public appointed sarpanch of Raver ineligible for encroaching on government premises)

त्यांची सासू माजी सरपंच लीलाबाई बन्सीलाल पाटील (देवरे) यांची अतिक्रमण मिळकत दीपाली पाटील यांनी धारण केली होती. माजी ग्रामपंचायत सदस्य साहेबराव बन्सीलाल पाटील (देवरे) व त्यांची सरपंच पत्नी दीपाली पाटील यांनी मिळकतीत अतिक्रमण केले.

या प्रकरणी गावातील माजी सरपंच अनिल भगवान शिरसाठ यांनी ॲड. विशाल मधुकर साळवे यांच्यामार्फत ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे विवाद अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला. जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदार माजी सरपंच अनिल शिरसाठ व लोकनियुक्त सरपंच दीपाली पाटील यांचे लेखी म्हणणे व तोंडी युक्तिवाद ऐकला. (latest marathi news)

District Collector, Abhinav Goel
Dhule News : मनपातील ‘त्या’ अधिकाऱ्यांना निलंबित करा; शिवसेना ठाकरे गट

तसेच शासकीय अधिकाऱ्याकडून चौकशी अहवाल प्राप्त केला. या प्रकरणी २६ डिसेंबर २०२३ ला अंतिम युक्तिवाद करण्यात आला. श्री. शिरसाठ यांच्यातर्फे ॲड. विशाल साळवे यांनी जोरदार युक्तिवाद केला.

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदार माजी सरपंच शिरसाठ यांच्यातर्फे करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून लोकनियुक्त सरपंच दीपाली पाटील (देवरे) यांना उर्वरित कालावधीसाठी सरपंच म्हणून अपात्र घोषित करण्याचा आदेश २६ फेब्रुवारी २०२४ ला दिला.

या निकालाकडे रावेर ग्रामस्थांसह तालुक्यातील राजकीय क्षेत्रातून लक्ष लागून होते. अर्जदारातर्फे ॲड. साळवे यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. मोनाली करडक, ॲड. कमलाक्षीदेवी पाटील यांनी सहकार्य केले.

District Collector, Abhinav Goel
Dhule News : शिंदखेडा तालुक्याला 86 कोटी : आमदार रावल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.