Dhule Students Tour to ISRO : इस्त्रो चले हम...जिल्हा परिषदेचे उड्डाण! चार तालुक्यातील 48 विद्यार्थ्यांची विमानाने वारी

Latest Dhule News : जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थी विज्ञान आणि अंतराळ संशोधनाविषयी अभिव्यक्त व्हावेत, त्यांच्यात हा दृष्टीकोन घट्ट रूजावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे यांनी दिली.
Dhule ZP
Dhule ZP esakal
Updated on

Dhule Students Tour to ISRO : ‘इस्त्रो चले हम....’ असे सांगत येथील जिल्हा परिषदेने शैक्षणिक स्तरावर उड्डाण घेतले आहे. चारही तालुक्यातील ४८ विद्यार्थी आणि आठ शिक्षकांना विमानाने इस्त्रोची वारी करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थी विज्ञान आणि अंतराळ संशोधनाविषयी अभिव्यक्त व्हावेत, त्यांच्यात हा दृष्टीकोन घट्ट रूजावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे यांनी दिली. (Dhule District Council Flight students to ISRO)

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सहावी ते आठवीतील सरासरी २१० विद्यार्थ्यांची लेखी परिक्षा घेण्यात आली. त्यातील उत्तीर्ण व मुलाखतीनंतर ४८ विद्यार्थ्यांची इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या बंगळूर येथील युनीटला भेट देण्यासाठी निवड करण्यात आली. यात २५ विद्यार्थिनी आणि २३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चारही तालुक्यातून एकूण १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात प्रत्येकी दोन विद्यार्थी उर्दू माध्यमाचे आहेत.

संकल्पना वास्तवात

मुख्य लेखा व वित्त अधिकारी पिंगळे म्हणाल्या, की इस्त्रोसाठी निवड झालेले होतकरू ग्रामीण विद्यार्थी गरीब, मजूर, अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील, काही नातेवाईकांकडे वास्तव्यास राहून शिक्षण घेणारे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत.

त्यांना बदलत्या तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणताना त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रूजावा, निरीक्षण शक्ती विकसीत होऊन त्यांनी प्रगतीची यशोशिखरे गाठावीत या हेतूने त्यांना ‘इस्त्रो’वारी घडवून आणण्याचे ठाणले. त्यासाठी वीस लाखांची तरतूद करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ब्लेझर, बॅग, प्रमाणपत्र, ट्रॉफी आदी विविध साहित्यही दिले जाणार आहे. (latest marathi news)

Dhule ZP
Suresh Kute : लोकांना फसविणाऱ्या ठकास भेटला महाठक, कुटेला लावला साडेतीन कोटींचा चुना

शास्त्रज्ञांशी संवाद

बंगळूर येथील इस्त्रोच्या कार्यालयात ४८ विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांशी संवाद साधता येईल. दोन ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन दिन आहे. या दिवशी ४८ विद्यार्थी, मुलाखतीतून निवडण्यात आलेले आठ शिक्षक व अन्य चार अधिकारी, असे एकूण ६० जण नाशिक येथून विमानाने बंगळूर येथे जातील. तसेच म्हैसूर येथील सेंट्रल फूड रिसर्च इन्स्टिट्यूटलाही त्यांना अभ्यास सहल म्हणून नेले जाईल.

शिवाय गार्डन, संग्रहालयाची वारी घडविली जाईल. हा विधायक उपक्रम अमलात येण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, मार्गदर्शक सीईओ विशाल नरवाडे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी सभापती संजीवनी शिसोदे, संग्राम पाटील, शिक्षण सभापती सोनी कदम, सभापती ज्योती बोरसे, शिक्षणाधिकाऱ्यांसह उपशिक्षणाधिकारी संजीव विभांडिक आदींनी मोलाच्या सहकार्यातून बळ दिले, असे श्रीमती पिंगळे यांनी सांगितले.

आकाशाशी जडले नाते...

जिल्हा परिषदेने आकाशाशी जडले नाते या उपक्रमांतर्गत इस्त्रोवारी प्रकल्प हाती घेतला. या अनुषंगाने सोमवारी (ता. ३०) सकाळी साडेदहाला आयोजक शिक्षण विभागातर्फे जिल्हा परिषद सभागृहात कार्यक्रम होईल. अध्यक्षा देवरे, जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी, सीईओ, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित असतील. संजय पाटील, सोनाली पाटील वक्ते असतील. निवडक ४८ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रदान होईल. त्यांची दुपारी साडेचारला आरोग्य तपासणी केली जाईल.

Dhule ZP
Latest Maharashtra News Updates: पुतळा उभारण्यातही तुम्ही पैसे खाल्ले आहेत - ठाकरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.