Gram Panchayat Election: धुळे जिल्ह्यात कुठे भाजप कुठे काँग्रेस तर कुठे मविआचे वर्चस्व

Gram Panchayat Election
Gram Panchayat Electionesakal
Updated on

धुळे : शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या निकालात महाविकास आघाडीचे १६ ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व, भाजपचे बुरूज ढासळल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर यांनी केला.

ते म्हणाले, की शिंदखेडा तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये साहूर, जोगशेलू, नेवाडे, चिमठाणे, दराणे, कलमाडी, विटाई, माळीच, नरडाणा, पिंप्राळ, वारूळ, आरावे येथे सरपंचांसहित बहुमत महाविकास आघाडीला मिळाले आहे.

रामी येथे महाविकास आघाडीला सदस्यांचे बहुमत मिळाले आहे. शिंदखेडा विधानसभेतील साक्री तालुक्यातील बळसाणे, नागपूर, उभंड येथे महाविकास आघाडीचे वर्चस्व निकालात दिसून आले. (Dhule district Where BJP where Congress and where Maha Vikas Aaghadi dominates Dhule News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Gram Panchayat Election
Dhule News : ‘त्या’ जागेच्या हक्काबाबत प्रस्ताव मनपाच्या महासभेपुढे

तालुक्यात भाजपचे विद्यमान चिमठाणे गटाचे जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र गिरासे, नरडाणा गटाच्या जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती संजीवनी शिसोदे, खलाणे गटाचे जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम, शिंदखेडा पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब बोरसे, बळसाणे येथील जिल्हा परिषद सदस्य व माजी सभापती मंगला सुरेश पाटील, वारूळचे दत्तू दोरीक यांच्या भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीला दणदणीत असे यश प्राप्त झाल्याचा दावा श्री. सनेर यांनी केला.

जिल्ह्यातील १२८ पैकी साक्री, धुळे, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यांतील १२० ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. १८) मतदान झाले. आठ ग्रामपंचायती पूर्वीच बिनविरोध झाल्या. त्यात सरपंचपदाचे १२, तर सदस्यपदाचे ४०० उमेदवार बिनविरोध झाले होते. उर्वरित १२० ग्रामपंचायतींच्या १,२१२ जागांसाठी २,३६२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

यात यंत्रणेकडून मंगळवारी (ता. २०) मतमोजणीसह निकाल जाहीर झाल्यानंतर शिरपूर तालुक्यात माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांचा करिष्मा कायम असल्याचे स्पष्ट झाले असून त्यात १७ पैकी १७ ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकविला. शिंदखेडा तालुक्यात २३ पैकी १४ ग्रामपंचायती आमदार जयकुमार रावल यांच्या ताब्यात आल्या. धुळे तालुक्यात ३३ पैकी १८ ग्रामपंचायती काँग्रेस, तर ११ भाजपच्या ताब्यात आल्या. साक्री तालुक्यात ५५ पैकी निम्म्या ग्रामपंचायतींवर नवे चेहरे देत मतदारांनी तरूणांना संधी, तर प्रस्थापितांना धक्का दिला आहे.

Gram Panchayat Election
Gram panchayat Election : प्रस्थापितांना धक्का अन् तरुणांना संधी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()