Dhule News : जिल्ह्यास 35 लाख टन चारा मिळणार; पशुसंवर्धन विभागातर्फे उपाययोजना

पशुसंवर्धन विभागातर्फे शेतकऱ्यांना वितरित चारा बियाण्यांमुळे जिल्ह्यात कोरडा व हिरवा असा एकूण ३५ लाख ६९ हजार टन चारा उपलब्ध होणार आहे.
fodder
fodder esakal
Updated on

Dhule News : गेल्या वर्षीचा अत्यल्प पाऊस, खरीप हंगामात अत्यल्प उत्पन्न आदींचा परिणाम चाऱ्यावर झाला. मात्र, पशुसंवर्धन विभागातर्फे शेतकऱ्यांना वितरित चारा बियाण्यांमुळे जिल्ह्यात कोरडा व हिरवा असा एकूण ३५ लाख ६९ हजार टन चारा उपलब्ध होणार आहे. तो एप्रिलपर्यंत पुरू शकतो, अशी माहिती विभागाने दिली.

जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास याची कोणीही इतर जिल्ह्यात वाहतूक करू नये, असा आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यापूर्वीच दिला आहे. (dhule district will get 35 lakh tonnes of fodder Measures taken by Animal Husbandry Department news)

जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी आणणे, जिल्ह्याबाहेरील निविदाधारकांना लिलाव देण्यात येऊ नये, जेणेकरून जिल्ह्यात चाराटंचाई भासणार नाही आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी जिल्हा प्रशासनाची सूचना आहे.

पशुधनाची स्थिती

कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात तीन लाख ६३ हजार ६६० लहान जनावरे, तर ९७ हजार ६५९ मोठी जनावरे आहेत. तसेच शेळ्या-मेंढ्यांची संख्या आठ लाख २४ हजार ६७३ आहे. जिल्ह्यात एकूण १२ लाख ८५ हजार ९९२ पशुधन आहे.

त्यांना प्रतिदिन पाच हजार १८७.६ टन चारा लागतो. जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई नव्हती. मात्र, २०२३ मध्ये पाऊस कमी झाल्याने चाऱ्याची उगवण कमी झाली. परिणामी अनेक ठिकाणी पाण्याबरोबरच चाऱ्याचीही चिंता निर्माण झाली.

विविध उपाययोजना

या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पावसाअभावी उत्पन्न कमी आले. तसेच ज्वारी, मक्याचेही अपेक्षित उत्पन्न न आल्याने चाऱ्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. या पार्श्वभूमीवर भविष्यात होणारी संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने उपाययोजना राबविण्यास सुरवात केली.

fodder
Dhule News : 6 लाख 60 हजार मुलांना जंतनाशक गोळ्या; 13 फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम

ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना मका, शुगरकेझ, ठोब यांचे बियाणे वाटप केले. या बियाणेवाटपालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनी अनुदानावर मिळालेल्या या बियाण्याची लागवड केली आहे. यातून ३० लाख पाच हजार २१३ टन, तर पाच लाख ६४ हजार १६२ टन वाळलेला, असा एकूण ३५ लाख ६९ हजार ३७५ टन चारा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. हा चारा जिल्ह्यातील पशुधनाला एप्रिलपर्यंत पुरू शकेल, असे विभागाने सांगितले.

तालुकानिहाय उपलब्ध होणारा चारा (टन)

* तालुका......हिरवा......कोरडा......

* धुळे......५,७८,९०९......१,१७,३५५.५

* शिंदखेडा......७,७४,९९२......१,३९,५९१.५

* शिरपूर......६,०१,९४३......९६,७१६.५

* साक्री......१०,४९,३६९......२,१०,५९८.५

* एकूण......३०,०५,२१३......५,६४,१६२

"संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास यांची शेतकरी, उत्पादकांसह कोणीही इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास मनाई आहे." -अभिनव गोयल, जिल्हाधिकारी, धुळे

"जिल्ह्यात चाऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना चाऱ्याचे बियाणे हवे असेल त्यांनी जवळच्या पशसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा."-डॉ. मिलिंद भणगे, प्रभारी आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, धुळे

fodder
Dhule News : धुळ्यात ‘हिस्ट्रिशीटर्स’ची आज हजेरी : पोलिस अधीक्षक धिवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.