Dhule Lok Sabha Election : पदरात केवळ एकदाच मंत्रीपदाचा लाभ; 72 वर्षांतील स्थिती

Lok Sabha Election : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात काँग्रेसने ४७, तर भाजपने गेल्या २५ वर्षांपासून सत्ता राखली आहे.
Dr. Subhash Bhamre
Dr. Subhash Bhamreesakal
Updated on

Dhule Lok Sabha Election : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात काँग्रेसने ४७, तर भाजपने गेल्या २५ वर्षांपासून सत्ता राखली आहे. असे असले तरी काँग्रेसकडून या मतदारसंघाला मंत्रीपदाची एकदाही संधी लाभली नाही. परंतु, भाजपने हा मतदारसंघ ताब्यात घेतल्यानंतर त्यास देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मंत्रीपद देण्यात आले. आताही होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपविरूध्द काँग्रेसमध्ये सामना झाला तर दुसऱ्यांदा मंत्रीपदाची माळ या मतदारसंघाच्या गळ्यात पडते किंवा नाही याची उत्कंठा लागलेली असेल. (Dhule Dr Subhash Bhamre statement of Constituency got minister post for first time marathi news )

काँग्रेसकडून १९५२ मध्ये शालिग्राम भारतीय, जनसंघाकडून १९५७ ला उत्तमराव पाटील, काँग्रेसकडून १९६२, १९६७ ते १९७१ मध्ये चुडामण आनंदा पाटील, काँग्रेसतर्फे १९७७ ला विजय नवल पाटील, तसेच १९८०, १९८४ ते १९९० रेशमा भोये, काँग्रेसकडून १९९१ ला बापू चौरे, १९९६ ला साहेबराव बागुल, काँग्रेसकडून १९९८ ला डी. एस. अहिरे, भाजपकडून १९९९ ला रामदास गावित.

पुन्हा काँग्रेसकडून २००४ ला बापू चौरे आणि २००९ ला भाजपने प्रताप सोनवणे यांच्या माध्यमातून या मतदारसंघात पाय रोवल्यावर २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांना विजयश्री मिळाली. त्यांना तिसऱ्यांदा मे २०२४ मधील निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिल्याने मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. यात लोकसभेची १८ वी निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

काँग्रेसचा वरचष्मा पण...

या पार्श्वभूमीवर पक्षनिहाय सत्तेचे अवलोकन केले असता लोकसभेच्या धुळे मतदारसंघात काँग्रेसने तब्बल ४७ वर्षे वर्चस्व राखल्याचे दिसून येते. यातही धुळे, साक्री तालुक्यातील उमेदवारांचा विजयात वरचष्मा राहिला तरी कुणालाही काँग्रेसकडून मंत्रीपद लाभू शकलेले नाही. याउलट भाजपकडून २०१४ ला डॉ. सुभाष भामरे हे प्रथमच विजयी झाल्यानंतर त्यांना देशातील तिसऱ्या क्रमांकाचे संरक्षण विभागाचे राज्य मंत्रीपद बहाल करण्यात आले आणि लोकसभेच्या धुळे मतदारसंघाला तब्बल ७२ वर्षानंतर पहिल्यांदा मंत्रीपद लाभले.  (latest marathi news)

Dr. Subhash Bhamre
Dhule Lok Sabha Election : धुळे लोकसभेतील चुरस अधिक वाढणार

प्रथमच मंत्रीपदाचे भाग्य

लोकसभेच्या ऐन २०१४ च्या निवडणुकीवेळी शिवसेनेतून डॉ. भामरे हे भाजपमध्ये दाखल झाले होते. ते एक लाख ३० हजाराच्या मताधिक्‍याने निवडून आले. प्रथमच खासदार आणि प्रथमच मंत्रिपदाचे भाग्य डॉ. भामरे यांना लाभले. त्यांनी सात जुलै २०१६ ला मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हा संरक्षण खाते मिळणारे डॉ. भामरे महाराष्ट्रातील चौथे नेते ठरले होते. त्यांना राजकीय वारसा लाभलेला आहे.

त्यांचे वडील स्व. रामराव पाटील यांची काँग्रेसमध्ये दमदार वाटचाल राहिली. ते धुळे- नंदुरबार जिल्हा बॅंकेचे पंधरा वर्षे अध्यक्ष होते. डॉ. भामरे यांच्या आई स्व. गोजरताई भामरे या साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या. असा भक्कम राजकीय वारसा असतानाही निष्णात कॅन्सरतज्ज्ञ असल्याने ते राजकारणाच्या पटलावर फारसे सक्रिय नव्हते.

आरोग्यसेवेच्या माध्यमातून त्यांचा दांडगा जनसंपर्क निर्माण झाला. त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर जनसंपर्क कामी आला आणि त्यांचे भाग्य उजळल्याचे मानले जाते. डॉ. भामरे आता तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातील निकालाकडे सर्वांचे लक्ष असेल.

Dr. Subhash Bhamre
Dhule Lok Sabha Election : आचारसंहितेप्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; विशेष कक्षाची स्थापना

धुळे तालुक्यालाही मंत्रीपद; पण एरंडोल मतदारसंघातून...

लोकसभा निवडणुकीत धुळे तालुक्याला मंत्रीपद लाभले, पण ते एरंडोल मतदारसंघातून विजय नवल पाटील यांच्या रूपाने मिळाले. त्यांनी वडिल ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व. नवलभाऊ आनंदा पाटील यांचा सामाजिक, राजकीय वारसा समृध्द केला. विजय नवल पाटील यांनी वडिलांच्या इच्छेनुसार वयाच्या विसाव्या वर्षी कृषी शाखेची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली.

पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी दिल्ली गाठली. तेव्हा १९६४ मध्ये त्यांनी आई-वडिलांना पत्र लिहिले. मी रोज संसद भवनाच्या परिसरातून महाविद्यालयात जात असतो. माझी तीव्र इच्छा आहे की भविष्यात मी या संसद भवनात उच्च पदावर असावे. त्यांची ही इच्छा काँग्रेसमार्फत १९७७ मध्ये लोकसभेची धुळे मतदारसंघातील निवडणूक जिंकून साकार झाली.

या पाठोपाठ एरंडोल मतदारसंघातून १९८०, १९८४ मध्ये विजय नवल पाटील यांनी विजय मिळवित खासदारकीची हॅटट्रिक साधली. लागोपाठ दोन निवडणुकांतील घवघवीत यशामुळे १९८० मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात विजय नवल पाटील यांचा विज्ञान-तंत्रज्ञान, अवकाश संशोधन विभागाचे उपमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. नंतर त्यांना केंद्रीय दळणवळण खाते देण्यात आले होते.

Dr. Subhash Bhamre
Dhule Lok Sabha Election : भाजपचे नाराज इच्छुक काँग्रेसच्या संपर्कात; पक्षांतर्गत संभ्रमावस्था कायम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.