Dhule Drought News : कापडणेकरांना मिळतेय 8 दिवसांआड पाणी; पाण्याचे स्रोत आटले

Dhule Drought : आता आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्याचे सर्वच स्रोत आटले आहेत.
A dry embankment near five wells. In the second photograph, puddles accumulated in the dam filled with water of Akkalpada.
A dry embankment near five wells. In the second photograph, puddles accumulated in the dam filled with water of Akkalpada.esakal
Updated on

Dhule Drought News : येथे आता आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्याचे सर्वच स्रोत आटले आहेत. आता केवळ चार कूपनलिका आणि एका विहिरीतून पाण्याने कापडणेकरांची तहान शमविण्याचा प्रयत्न होत आहे. अक्कलपाड्याच्या पाण्याने अर्धा भरलेल्या बंधाऱ्या‍तही आता केवळ डबकेच साचले आहे. अक्कलपाड्याच्या पाण्याने हा बंधारा पूर्ण भरणे गरजेचे होते. येथील लोकसंख्या २० हजारांवर आहे. (kapadnekar are getting water every 8 days )

जिल्ह्यातील सर्वाधिक मोठ्या गावांपैकी एक आहे. येथे पाणीपुरवठ्यासाठी देवभाने धरण हा मुख्य स्रोत आहे. हे धरण कोरडेठाक झाले आहे. आता भात नदीवर पाच विहिरींजवळ असलेल्या दोन कूपनलिकांमधून पाणीपुरवठा होत आहे. नव्याने दोन कूपनलिका केलेल्या आहेत. नव्या कूपनलिका केल्यानंतर जुन्या दोन कूपनलिकांचे पाणी कमी झाले आहे.

शनी महाराज मंदिरामागील विहिरीचाही पाणीपुरवठ्यासाठी उपयोग होत आहे. तिचा दिवसातून दोन वेळा उपसा होत आहे. बिलाडी रस्त्यालगतच्या दोन कूपनलिकांचेही पाणी खोलवर गेले आहे. एकंदरीत चार कूपनलिकांच्या सह्याने गावाची तहान भागविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

‘त्या’ तीन विहिरीही महत्त्वपूर्ण

सरवड रस्त्याजवळील एक, सोनगीर रस्त्याजवळील एक व ग्रामपंचायतींजवळील एक अशा तीन विहिरींतील पाण्याने येथील पाण्याचे हौद भरले जातात. त्यातून गुराढोरांची तहान शमविली जात आहे. हे पाणी कपडेलत्ते धुण्यासाठी उपयोगी ठरत आहे. (latest marathi news)

A dry embankment near five wells. In the second photograph, puddles accumulated in the dam filled with water of Akkalpada.
Dhule Drought News : पाणीसाठा टिकण्यासाठी पदरमोड गाळ उपसा; भविष्यातील पाणी टंचाईवर पर्याय

पाच विहिरींजवळील बंधाऱ्याचे खोलीकरण

भात नदीवर पाच विहिरींजवळ ब्रिटिशकालीन मोठा बंधारा आहे. यास शिवकालीन बंधारा असेही संबोधले जाते. या बंधाऱ्‍याचे खोलीकरण करणे आवश्यक आहे. खोलीकरण झाल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याचे संचयन वाढणार आहे. पावसाळ्याच्या उत्तरार्धात तुडुंब भरल्यास त्यानंतर मार्चपर्यंत हे पाणी टिकू शकते. खोलीकरणातून हा बंधारा कापडणेकरांची तहान शमवू शकतो. मात्र खोलीकरणाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षच आहे.

तो बंधारा पूर्ण भरणे आवश्यक होता

खारा नाल्यावर मातीचा बांध असलेला मोठा बंधारा आहे. या बंधाऱ्याचे खोलीकरण झालेले आहे. हा बंधारा पांझरेच्या पाटचारीतून भरला जातो. अक्कलपाड्याच्या आवर्तनातून अर्धवट भरण्यात आला. त्यानंतर पाणीच बंद झाले. हा बंधारा तुडुंब भरला असता, तर येथील टंचाई जूनअखेरपर्यंत कमी झाली असती.

मदत ‘सकाळ’ची..!

पाच विहिरींजवळील बंधाऱ्याचे सात वर्षांपूर्वी काही प्रमाणात खोलीकरण करण्यात आले होते. यासाठी ‘सकाळ तनिष्का’ ग्रुपच्या माध्यमातून ‘सकाळ’ माध्यम समूहाने सुमारे दीड लाखाची मदत केली होती.

A dry embankment near five wells. In the second photograph, puddles accumulated in the dam filled with water of Akkalpada.
Dhule Drought News : देवभाने धरणातून गाळ उचलण्यास वेग; धरण झाले कोरडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.